माजी खा.स्व.सूर्यभानजी वहाडणे प्रतिष्ठाणच्यावतीने माजी नगराध्यक्ष अध्यक्ष श्री.विजय वहाडणे यांच्या हस्ते कोर्हाळकर, ढाकणे, शहा यांना गौरविण्यात आले..!!

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी- संपुर्ण आयुष्यभर योगसेवा करणारे कोपरगाव शहरातील जेष्ठ योगाचार्य मा. श्री. उत्तमभाई शहा व

त्यांचे चिरंजीव योग प्रशिक्षक मा. श्री. अभिजितजी शहा यांचा सेवाव्रती सन्मान पत्र देऊन माजी खा. स्व. सूर्यभानजी वहाडणे प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष श्री. विजयराव वहाडणे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे गोदामाई प्रतिष्ठानचे श्री.आदिनाथजी ढाकणे (सामाजिक अभियांत्रिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त) व त्यांचे चिरंजीव कु.प्रज्वल (नॅशनल योगा स्पर्धेत सिल्व्हर मेडल व खेलो इंडियाला निवड) कु. वैष्णवी (योगा नॅशनल) झाल्याबद्दल त्यांचे निवासस्थानी जाऊन सन्मान करण्यात आला.

शहरातील जेष्ठ योगा शिक्षिका सौ. वृन्दाताई कोऱ्हाळकर यांनाही सेवाव्रती सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.


विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या, नैपुण्य प्राप्त करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याचा छोटासा उपक्रम स्व.मा.खा. सूर्यभानजी प्रतिष्ठानचे वतीने करण्यात येत आहे. यानंतरही हा उपक्रम असाच सुरू रहाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *