संजीवनी उद्योग समुहाचेवतीने प्रेमचंद मोरे यांचा सत्कार बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
अहमदनगर न्यू इंडिया इंशुरन्स कंपनीचे डिव्हीजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे यांची पुणे कार्यालयात रिजनल मॅनेजरपदी बढती झाल्याबद्दल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचेवतीने गुरुवारी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे,संचालक सर्वश्री. विवेक कोल्हे, फकीरराव बोरणारे, भास्करराव भिंगारे, ज्ञानेश्वर परजने, निवृत्ती बनकर, साहेबराव कदम, शिवाजीराव वक्ते, अरूणराव येवले, अशोकराव औताडे, सोपानराव पानगव्हाणे, संजय होन, विलास वाबळे, मनेश गाडे, संगिता राजेंद्र नरोडे, श्रीमती सोनुबाई दशरथ भाकरे, प्रदीप नवले, राजेंद्र कोळपे, मच्छिंद्र लोणारी, कामगार संचालक वेणुनाथ बोळिज, बी.एम. वक्ते, श्री. शेख आदी उपस्थीत होते. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरख्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी स्वागत केले; लेखापाल एस.एन. पवार, उपमुख्यलेखापाल प्रविन टेमगर यांनी कारखाना विमाबद्दल माहिती दिली.
श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, विमा संरक्षण काळाची गरज आहे. न्यु इंडीया इंशुरन्स कंपनीने सहकारी साखर कारखान्यांसाठी सभासद, शेतकरी, उस उत्पादक, कामगार आदिसाठी त्यांच्या खिशाला परवडेल आशI विमा पॉलीसी काढाव्यात व जोखीम काळात सर्वाधिक परतावा देऊन सर्वांना आधार द्यावा. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *