गोधेगांव नं.१ सोसायटीच्या अध्यक्षपदी सुभाषराव कानडे तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब कोळसे यांची निवड…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील पूर्व भागातील गोधेगाव नं.१ सोसायटीच्या अध्यक्षपदी सुभाषराव नारायण कानडे तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब शामराव कोळसे यांची नुकतीच निवड करण्यांत आली. त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तालुका सहायक निबंधक सहकारी संस्थेचे आर. एस. जोशी यांनी काम पाहिले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक माधवराव राघवणे होते. अध्यक्षपदासाठी श्री. सुभाष कानडे यांच्या नावाची सुचना नानायण सोळसे यांनी केली तर त्यास बाळासाहेब बोरकर यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्षपदासाठी बाबासाहेब कोळसे यांच्या नावाची सुचना संभाजी कानडे यांनी केली तर त्यास विठठल शिरसाठ यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी संचालक सर्वश्री प्रमोद रांधवणे, अशोकराव राधवणे, सौ वर्षा कानडे, रतनबाई साळूके, मंगलबाई कानडे, आसाराम हुसळे उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा बाजार समितीचे माजी संचालक माधवराव रांघवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. सत्कारास उत्तर देतांना अध्यक्ष सुभाषराव कानडे म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या सहकार्याने सोसायटीच्या सर्व सभासदांसाठी असणा-या योजना राबवुन त्यांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करू. अध्यक्षपदावरून बोलतांना माधवराव रांघवणे म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी पुर्व भागातील शेतकरी सभासदांच्या अडचणी प्राधान्याने सोडविल्या आता युवानेतृत्व विवेक कोल्हे त्याच निर्णय क्षमतेने सोसायटी कामकाजात अत्याधुनिकता आणत कार्यरत आहेत. शेवटी सचिव आण्णासाहेब निकम यांनी आभार मानले.

फोटोओळी:-
कोपरगांव गोधेगाव नं.१ सोसायटीच्या अध्यक्षपदी सुभाषराव कानडे तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब कोळसे यांची निवड झाल्याबददल त्यांचा माधवराव रांधवणे व सर्व संचालकांनी सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *