कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहारातील रस्त्यासाठी निधी उपलब्ध असतांना देखील शहरातील रस्त्यांची कामे रखडली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. मात्र मागील काही आठवड्यापासून कोपरगाव शहरातील बहुतांशी रस्त्यांची कामे सुरु असून काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास कमी झाला असून नागरिकांच्या अडचणी काही अंशी कमी झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असल्याचे श्री. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
कोपरगाव शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रभाग क्र. ९ मध्ये १ कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या छत्रपती श्री संभाजी महाराज सर्कल ते गोकुळनगरी रस्त्याच्या मजबूतीकरण व डांबरीकरण कामाचे व १५ लक्ष रूपये निधीतून करण्यात येणाऱ्या नगरपरिषद हद्दीतील हुसळे घर ते सुपेकर घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोपरगाव शहरातील रस्त्यांच्या झालेल्या वाईट अवस्थेचा परिणाम शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर झाल्यामुळे अगोदरच अडचणीत असलेले व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र रस्त्यांची कामे सुरु झाल्यामुळे शहरातील नागरिक व व्यावसायिकांना दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून दर्जेदार रस्ते करण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना शहराध्यक्ष कलवींदरसिंग डडीयाल, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. माधवी वाकचौरे, वर्षा गंगूले, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष कार्तिक सरदार, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, जावेद शेख, डॉ. तुषार गलांडे, प्रकाश दुशिंग, संतोष टोरपे, चंद्रशेखर म्हस्के, डॉ. राजेंद्र रोकडे, यश हुसळे, भोसले, पोमण, भागवत, शेख, जुनेद शेख, जावेद शेख, संतोष गडाख, मुकुंद इंगळे, काले, श्रीमती कोपरे, श्रीमती आव्हाड, श्रीमती गडाख, नगर अभियंता ओंकार महाडिक, नितीश मिरीकर, दिपक बडगुजर, हर्षवर्धन सुराळकर, पी.के.गायकवाड आदी उपस्थित होते.
चौकट :- रस्त्यांची कामे लवकरात लवकर सुरु होण्याची कोपरगाव शहरातील नागरिकांना अपेक्षा होती मात्र रस्त्यांची कामे रखडली होती. शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांमुळे मुहूर्त लागला असून सर्वच ठेकेदारांनी रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण करावी – अशोक कोठारी (माजी नगराध्यक्ष)

फोटो ओळ:-
कोपरगाव येथे रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी आ. आशुतोष काळे व मान्यवर.
