

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्री क्षेत्र वाशेरे ते श्री क्षेत्र शिर्डी साईबाबा पालखी सोहळ्याचे शिर्डीमध्ये राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ व शिर्डी शहर नाभिक संघटना व नाभिक समाज बांधवांतर्फे स्वागत करण्यात आले.



यावेळी अकोले तालुका नाभिक समाज कार्याध्यक्ष श्री अमोलभाऊ कोल्हाळ, शिर्डी शहर नाभिक संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री रामनाथजी वर्पे, अहमदनगर जिल्हा राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री मनोजभाऊ वाघ, जिल्हा संपर्कप्रमुख श्री संजयभाऊ जाईबहार, पतंजली उद्योग समुहाचे श्री सुनिलभाऊ गायकवाड व हॉटेल व्यवसायिक श्री आनंदभाऊ बिडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
