
कोपरगाव प्रतिनिधी:-
अनाथांची माय म्हणुन संपूर्ण महाराष्ट्रात-भारतात आपल्या कार्याने स्वतःची वेगळी ओळख निमार्ण करणाऱ्या सिंधुताई सपकाळ [माई]आपण सर्वाना सोडुन गेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एक असहनीय दुःख झाले,प्रत्येकाने आपापल्या परिने त्यांना श्रधांजली देखील अर्पण केली. परंतु फक्त श्रधांजली अर्पण करण्याइतपतच त्यांचे कार्य होते का?…तर निश्चितच नाही अस प्रत्येकाला वाटेल. तर मग आपण खऱ्या अर्थाने त्यांना श्रधांजली वाहु या,आपण कोपरगांव तालुका किंवा शहरात जे जे अनाथ मूल-मुली दिसतील त्यांना आपापल्या परिने मदत करू या! सदरिल मदत तुम्ही आम्ही स्वतः आर्थिक-शारिरिक-मानसिक किंवा वस्तु स्वरुपात जरी केली तरी ती स्व.सिंधुताई[ माई ] यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
