अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली:-गणेश कोचिंग संस्थापक विजयजी शेटे…

गडचिरोली

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरीत मागील काही वर्षात श्री.गणेश कोचिंग क्लासेस या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुताई सपकाळ यांचे आगमन झाले असता त्यांचे स्वागत श्री.गणेश कोचिंग क्लासेस चे संस्थापक, चेअरमन श्री.व सौ. विजयजी शेटे व कामिनी विजय शेटे तसेच कोपरगाव माजी आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे , सुत्रसंचालिका राजेश्री पिंगळे, पत्रकार संतोषजी जाधव या सर्वांनी जल्लोषात कोपरगाव नगरीत अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे स्वागत करण्यात आले होते. त्या छोट्या क्षणाच्या काही आठवणी..!!

ममता, माया, वात्सल्य, प्रेम, जिद्द तसेच चिकाटी अंगीकारलेल्या कार्यासाठी पूर्णपणे झोकून देण्याची वृत्ती व ते कार्य सिद्धीस नेण्यास लागणारं कौशल्य. काय आणि किती सांगू या वात्सल्यसिंधूचा महिमा अशा या अनाथांच्या मायला श्री.गणेश कोचिंग क्लासेस कडुन व विजयजी शेटे परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

श्री. गणेश कोचिंग क्लासेस संस्थापक विजयजी शेटे कोपरगाव…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *