कोपरगांव प्रतिनिधी:-
शिधापत्रिका नव्याने दुरूस्त करणे, विभक्तीकरण, संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, दिव्यांग प्रमाणपत्र आदि तहसिल पातळीवर असणा-या सेवेचा वंचित घटकांनी थेट लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच किसन सोपान गव्हाळे यांनी केले.
तहसिलदार विजय बोरूडे यांच्या प्रयत्नांतुन व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या सहकार्यातुन आपेगांव येथे एकदिवसीय शिबीराचे आयोजन करण्यांत आले होते त्याचे उदघाटन सरपंच सौ मंगलताई ज्ञानेश्वर भूजाडे यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी संजय गांधी निराधार योजनेच्या अधिकारी श्रीमती गोरे, श्री. बनसोडे, श्री. फरताळे, पुरवठा अधिकारी श्री. भिंगारदिवे आदिंनी शासकीय योजना व त्यासाठी लागणा-या कागदपत्रांची माहिती दिली. या एकदिवसीय शिबीरात आपेगावातील असंख्य लाभार्थ्यांनी शिधापत्रिका, संजय गांधी व अन्य योजनाबाबत माहिती घेवुन त्यांच्याकडील अपूर्ण कागदपत्रांची पुर्तता करत लाभ घेतला. याप्रसंगी बाजार समितीचे माजी संचालक अंबादास पाटोळे, सोसायटीचे अध्यक्ष मच्छिंद्र साबळे, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद खिलारी, जिल्हा संघटक परमेश्वर कराळे, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब गव्हाळे, अमोल पगारे, वसंत गायकवाड, ग्रामसेवक काटे, प्रकाश गव्हाळे, आसाराम पगारे, सिताराम गोरे, रामभाउ खिलारी, आबा कदम, शिवराम भुजाडे, दत्तात्रय लोहकरे आदि उपस्थित होते. शेवटी नानासाहेब गव्हाळे यांनी आभार मानले.


फोटोओळी:-
कोपरगांव आपेगांव येथे तहसिलदार विजय बोरूडे यांच्या प्रयत्नांतुन शासकीय योजनाबाबत माहिती मार्गदर्शन व प्रत्यक्ष कार्यवाही अंतर्गत एकदिवसीय शिबीराचे आयोजन करण्यांत होते त्याचे उदघाटन सरपंच मंगलताई भुजाडे, उपसरपंच किसन गव्हाळे यांच्या हस्ते झाले.
