डाउच बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे दत्तात्रय दहे बिनविरोध..!!

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील डाउच बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे दत्तात्रय किसन दहे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक महेश काळे यांनी काम पाहिले.
भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली. सरपंच शोभा माळी यांनी नवनिर्वाचित उपसरपंच दत्तात्रय दहे यांचा सत्कार केला. त्यांच्या निवडीबददल सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे संचालक संजय होन, शिवाजीराव वक्ते, भाउसाहेब दहे, धर्मा दहे, अंकुश गायकवाड, एकनाथ माळी, मच्छिंद्र माळी, बबनराव माळी, धर्मा गणपत दहे, अमोल होन, रामभाउ दहे आदिंनी अभिनंदन केले. नवनिर्वाचित उपसरपंच दत्तात्रय दहे सत्कारास उत्तर देतांना म्हणाले की, गांवच्या विकासासाठी युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहुन जनसामान्यांपर्यंत विकासाच्या योजना पोहोचवुन वंचित घटकांना लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू. शेवटी बाबा दहे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *