
कोपरगांव प्रतिनिधी:- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी “चबुतरा” उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. मी नगराध्यक्ष झाल्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रेमींची एक सर्वसमावेशक देखभाल व पावित्र्य समिती स्थापन केली. नंतर ही समितीची धर्मादाय आयुक्तांकडे नोंद करून घेतली. मी तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, बांधकाम अभियंता श्री. डिगाम्बर वाघ यांच्या माध्यमातून पुर्णाकृती पुतळ्यासाठी लागणाऱ्या सर्व शासकिय मान्यता आणल्या. त्यानंतर चबूतऱ्याचे काम सुरू झाले. ते लवकर पूर्णत्वास जावे यासाठी कामाला वेग देण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे देखभाल व पावित्र्य समितीही कार्यरत आहे. लवकरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची उभारनी होऊन कोपरगाव शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

विजय वहाडणे
नगराध्यक्ष,
कोपरगांव नगरपरिषद, कोपरगाव
