भुकेल्यास दोन घास शिवाजीनगर जळगाव येथे शिवभोजन थाळीचा महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते उदघाटन..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (जळगाव) :-
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सर्वात महत्वकांक्षी योजना म्हणुन शिव भोजन थाळी कडे पाहिले जाते.गोर गरिब ज्यांच्याकडे पैसा नाही ,ज्यांची रोजच्या जेवणाची भ्रांत आहे,तसेच निराधार ,बेघर नागरिकांच्या जेवणाची सुविधा शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून संपुर्ण राज्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.जळगाव येथे शिवाजीनगर परिसरात शिव भोजन थाळीचे सुरुवात झाली असुन सौ.छाया सुदाम कोरडे यांच्या पुढाकाराने शिव भोजन केंद्र चालु करण्यात आले आहे.

शिवाजी नगर मनपा दवाखान्याच्या समोर गरीब व गरजू लोकांसाठी शिवभोजन केंद्राचे उद्घाटन जळगाव मनपाच्या महापौर सौ जयश्री ताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी जळगाव मनपा चे माजी महापौर श्री नितीन भाऊ लढ्ढा शिवसेनेचे महानगरप्रमुख श्री शरद भाऊ तायडे नगरसेविका गायत्री उत्तम शिंदे नगरसेवक नवनाथ दारकुंडे जळगाव मनपाचे उपायुक्त श्री गोसावी साहेब उत्तम शिंदे विनायक पाटील छगन दादा कोरडे व परिसरातील महिला बचत गटाच्या सदस्य उपस्थित होते.या शिवभोजन थाळी मुळे गोर गरिब जनतेला फायदा होणार आहे असे या प्रसंगी सौ.छायाताई कोरडे म्हणाल्या आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *