को.ता.संभाजी ब्रिगेड अध्यक्षपदी शिवश्री.चंद्रशेखर म्हस्के व शहर अध्यक्षपदी शिवश्री. निखील डांगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मंगेश पाटील व बाळासाहेब देवकर यांच्या हस्ते करण्यात आला…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुका संभाजी ब्रिगेड अध्यक्ष पदी शिवश्री. चंद्रशेखर म्हस्के व शहर अध्यक्ष पदी शिवश्री.निखिल डांगे यांची निवड झाल्याबद्धल त्यांचा सत्कार माजी.मराठा सेवा संघ तालुकाअध्यक्ष मंगेश पाटील व मराठा महासंगाचे माजी. उपतालुकाप्रमुख बाळासाहेब देवकर यांचे हस्ते सत्कार कऱण्यात आला
या वेळी , प्रत्येक तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा हे ध्येय उराशी बाळगून मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेड एक नवी दिशा आणि नवा विचार देणारे कार्य यापुढे करणार आहे…..असे माजी.तालुकाअध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले.
“अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला” हा विचार तरुणांमध्ये रुजवून त्यांना जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या विषयांचे भान देणारे मार्गदर्शन आणि व्यावसायिक मेळावे अशाप्रकारचे कार्यक्रम राबविणार आहेत.
मराठा सेवा संघाचे.संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, राज्य संपर्कप्रमुख दशरथ गव्हाणे, जिल्हाध्यक्ष संतोष भागडे यांनी या दोघांची निवड केली.त्याबद्धल सर्वे स्तरातून श्री.म्हस्के व श्री.डांगे यांना सर्वजन शुभेच्छा देत आहेत.लवकरच शहर व तालुक्यातील नवीन पदाधिकारी याची निवड , नवीन दोन्ही पदाधीकारी करणार आहेत असे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *