सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचा उस वाहतुक वाहन मालक चालकांना स्मार्टकार्डद्वारे डिझेल वितरणांचा विवेक कोल्हेंच्या हस्ते शुभारंभ..!!

कोपरगाव

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांची आधूनिकतेकडे वाटचाल..!!

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांची डिजीटल इंडिया संकल्पनेकडे वाटचाल..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-
आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धेचे युग असुन त्यात वेगाने तंत्रज्ञानाचा समावेश होत आहे, काळानुरूप त्याच्याशी सांगड घालुन मार्गक्रमण करणाराच या स्पर्धेत टिकणार असुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे तंत्रज्ञानावर आधारीत आधूनिकतेकडे पाउल पुढे पडले असुन बॉयलर व उत्पादन विभागातील आवश्यक ठिकाणी ॲटोमायझेशन करून हा कारखाना देशात सगळयाच बाबतीत अग्रेसर राहणार असल्याची ग्वाही कारखान्यांचे तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांनी दिली. कारखान्यांच्या सुमारे एक हजार वाहन मालक चालकांना अमृत व सुवर्ण शुगरकेन ट्रान्सपोर्टच्यावतीने अहमदनगर जिल्हयात सर्वप्रथम स्मार्टकार्डद्वारे डिझेल वितरणांचा शुभारंभ विवेक कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यांत आला. यात पारदर्शकतेबरोबरच विश्वासार्हता जपली जाणार आहे.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी स्वागत व प्रास्तविक केले. याप्रसंगी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक शिवाजीराव वक्ते, सोपानराव पानगव्हाणे, फकिरराव बोरनारे, निवृत्ती बनकर, प्रदिप नवले, वेणुनाथ बोळीज, अशोकराव औताडे, अशोकराव भाकरे, अमृतचे अध्यक्ष पराग संधान, एच आर मॅनेजर प्रदिप गुरव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, मानद कार्यकारी संचालक बापूसाहेब औताडे, केन मॅनेजर गोरखनाथ शिंद, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, यांच्यासह विविध खातेप्रमुख, उपखातेप्रमुख अमृत सुवर्ण संजीवनी शुगरकेन संस्थेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, कारखान्यांच्या उस वाहतुक करणा-या वाहनामध्ये डिझेल टाकल्यावर तात्काळ त्याचा संदेश संबंधीत वाहनमालकांना भ्रमणध्वनीद्वारे जाणार आहे त्यामुळे वाहनचालकाने किती डिझेल भरले याची माहिती मुळ मालकांना काही क्षणाधार्थात समजणार आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांच्या संकल्पनेतून कारखाना आधूनिकतेकडे वाटचाल करीत आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपोनदादा कोल्हे यांनी अधिकाधिक पारदर्शकता रहावी यासाठी शेतकरी सभासदांच्या उस प्लॉटचे सव्र्व्हेक्षण उपग्रहाद्वारे, गाळपासाठी तुटून येणा-या उसाचे वजन
मनुष्यविरहीत काटयाद्वारे करून त्याची अद्यावत माहिती त्याच क्षणाला संबंधीतांच्या भ्रमणध्वनीवर संदेशाद्वारे पाठविण्यांच्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देवुन त्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याने देशात व राज्यात साखर कारखानदारीचे प्रत्येक पायलट प्रकल्प सर्वप्रथम येथे राबवुन त्याचा नांवलौकीक निर्माण केला आहे आणि भविष्यातील सर्व आव्हानांना कोल्हे कारखाना त्याच सक्षमपणे तोंड देवुन यशस्वी मार्गाकमण करेल असेही ते शेवटी म्हणाले. उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.

फोटोओळी-कोपरगांव
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांच्या सुमारे एक हजार वाहन मालक चालकांना अमृत व सुवर्ण शुगरकेन ट्रान्स पोर्टच्या वतीने अहमदनगर जिल्हयात सर्वप्रथम स्मार्टकार्डद्वारे डिझेल वितरणांचा शुभारंभ तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यांत आला. याप्रसंगी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *