
कोपरगाव प्रतिनिधी:- अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या कर सल्लागार संघटनेच्या स्थापना प्रसंगी कोपरगाव येथील कर सल्लागार नितीन डोंगरे यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे
नविन कर सल्लागार यांना येणाऱ्या अडचणी कर विषयक कायद्याची माहिती होणारे बदल आणि येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आली असून अध्यक्ष पदी किशोर गांधी यांची निवड करण्यात आली आहे
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून अनेक व्यवसायीकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले
नितीन डोंगरे यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या कर भरताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेची मदत होईल व नवीन पिढीला मार्गदर्शन केले जाईल असे विचार व्यक्त केले
करविषयक कायद्यात सुधारणा आणि बदल अभ्यास करून योग्य पद्धतीने नियोजन केले जाईल असा आशावाद व्यक्त करण्यात आला
संघटनेच्या माध्यमातून मार्गदर्शक सूचना करण्यात येणार असल्याने आनंद व्यक्त करण्यात आला
