
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला., तसेच २६ नोव्हेंबर मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील शहिद झालेल्या जवान,पोलिस व निष्पाप नागरीकांप्रती आदरांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी ॲड श्री. नितीनराव पोळ यांनी संविधानाची प्रतिज्ञा वाचन करुन संविधानबाबत माहिती दिली. संविधानाबाबत भारतीय नागरीकांना विचार-आचार सामाजीक आर्थिक व राजनैतिक व न्याय प्रक्रियेचे स्वातंत्र मिळाले असुन राष्ट्रीय एकात्मता व बंधुत्वयांचे महत्व पटवुन दिले. विविध जाती धर्मिय पंथ एकत्रित करण्यात संविधानामुळेच मदत झाली. सर्व सामान्य नागरीकांना नैतिक अधिकार संविधानामुळेच मिळाले. राज्य कारभार कसा चालवावा ग्रामपंचायत पासुन ते लोकसभेपर्यंत कायदे नियम संविधानामुळेच मिळाले. सर्व सामान्यमाणसाला केंद्रस्थानी धरुन यादेशात कायदे करण्यात आले व धार्मिक स्वातंत्र देण्यात आले. पंतप्रधानापासुन ते सर्वसामान्यमाणसाला एकाच मताचा अधिकार हा कायदा सुद्धा संविधानामुळेच मिळाला. आजपर्यंत देशात संविधान दिन साजरा करण्यात येत नव्हता परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिन साजरा करण्याचे ठरविले.

यावेळी आर.पी.आय. तालुकाध्यक्ष श्री.जितेंद्र रणशुर यांनी जगात अनेक देशांनी घटना तयार केली आहे परंतु जेव्हा त्यांना दुरुस्ती करण्याची गरज पडते. तेव्हा भारतीय घटनेचा अभ्यास केला जातो. एखाद्या निवडणुकीत किंवा कायदा करताना जेव्हा दोन्ही बाजुस समसमान मते नोंदवली जातात तेव्हा पिठासीन अधिकारी यांचे एकमत निर्णायक धरुन न्याय दिला जातो. हा कायदा भारतीय घटनेत आहे याचा प्रत्यय अमेरीकेच्या राष्ट्रध्यक्ष निवडणुकीत आला व त्यानुशंगाने राष्ट्रध्यक्ष निवडण्यात आलेले आहे. याचा अभिमान प्रत्येक भारतीयाने बाळगुन आपल्या संविधानाविषयी आदर व्यक्त करावा व संविधानानेच आपण व आपली लोकशाही टिकुन आहे अशी माहिती दिली.
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांनी भारताची लोकशाही कायद्याचे राज्,सामान्य नागरिकांचे हक्क व अधिकार, अभाधीत ठेवण्याचे सामार्थ्य घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संविधानाव्दारे आपल्याला दिले आहे.आचार,विचार, राहणीमाणाचे स्वातंत्र्य आपल्या हक्कासाठी मागणी व संघर्ष, धर्म स्वांतत्र्य जाती विषयी आचरणाचे स्वातंत्र, लोकशाहीचे स्वांतत्र संविधामामुळेच आपल्याला मिळाले आहे. म्हणुन घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे आपण ऋणी असल्याचे महणाले.
या कार्यक्रमात विनोद राक्षे, अविनाश पाठक, विनोद राक्षे, रविद्र रोहमारे, विजय भडकवाडे, जयेश बडवे, दिपक चौधरी, विक्रम पाचोरे, अल्ताफ कुरेशी, सुशांत खैरे, सोमनाथ म्हस्के, राहुल सुर्यवंशी, ॲड गणेश मोकळ, सोमनाथ आहेर, संदिप निरभवणे, बापु पवार,संदिप वाकचौरे,विजय चव्हाणके, प्रमोद नरोडे, सचिन सावंत, गोपी गायकवाड, बाळासाहेब राउत,महेश गोसावी, किरण सुपेकर, खालीकभाई कुरेशी,रविंद्र शेलार, शंकर बिऱ्हाडे, अर्जुन मोरे,अल्ताफ शेख, अतुल दोरकर,सुनिल मरसाळे,असिफ शेख, संतोष साबळे, दिनेश मुंगसे,
जयेश बडवे,निलेश बोऱ्हाडे, चंद्रकांत वाघमारे, गोपी सोनवणे, रविद्र लचुरे, मुन्ना दरपेल, भानुदास पवार, सतिष रानोडे, संजय वाकचौरे, शक्ती परदेशी, सागर गंगुले, फकिरमंहमद पहिलवान, विजय चव्हाणके, मंदार बागले, लियाकत शेख,प्रभुदास पाखरे,समीर सुपेकर आदि उपस्थित होते. सुत्रसंचालन सुशांत खैरे तर आभार अविनाश पाठक यांनी मानले.
