

कोपरगाव प्रतिनिधी:-
लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारितेला म्हटले जाते.आज भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत आज कोपरगाव येथे बिपिन गायकवाड यांच्या महाराष्ट्र माझा या न्युज पोर्टलचे उदघाटन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव माजी पोलिस अधिक्षक के.पी.रोकडे कोपरगाव मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डाँ.अरुण गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव होते.


या कार्यक्रमाचे प्रास्तविक पत्रकार बिपिन गायकवाड यांनी केले. या प्रसंगी पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव म्हणाले की,भारतीय संविधानाने सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय दिला आहे.प्रत्येक नागरिकांचे रक्षण संविधान करत आहे.प्रत्येक धर्मियांच्या धर्म ग्रथांचे रक्षण भारतीय संविधानच करत आहे.भारतीय संविधान पवित्र ग्रंथ आहे.भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांना व्यक्ती स्वातंत्र्य, हक्क अधिकार बहाल केले आहे.भारतीय बौध्द महासभेचे महाराष्ट्रचे संपर्क प्रमुख शांतारामजी रणशुर यांनी भारतीय संविधानाची महती उपस्थितांना समजावुन सांगितले की,संविधान लागु होण्यापूर्वी राजा राणी पोटी जन्म घेत असत परंतु डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित संविधानामुळे प्रत्येक नागरिक निवडणुकीच्या माध्यमातून राजा होवु शकतो.भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांना गरिब असो श्रीमंत असो अशा सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे

कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डाँ.अरुण गव्हाणे यांनी बिपिन गायकवाड यांना शुभेच्छा देत भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकारातुन पत्रकारीतेच्या माध्यमातुन जनतेचे प्रश्न सोडवावे त्याच बरोबर मा.पोलिस अधिक्षक के.पी.रोकडे यांनीही शुभेच्छा व्यक्त करत आपल्या भाषणात म्हणाले की,पत्रकारीता समाजाचा आरसा आहे.समाजाला गोर गरिबांना न्याय देण्याचे माध्यम आहे.या माध्यमातुन जनतेचे प्रश्न सोडवावे.

पत्रकार सोमनाथ सोनपसारे यांनी भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जावा परंतु संविधान दिन अनेक नागरिकांना माहितीच नाही अशी खंतही व्यक्त केली.जेऊर कुंभारीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पाटिलबाबा वक्ते यांनी आपल्या भाषणात म्हणाले की,भारतीय संंविधान प्रत्येक नागरिकांचे आहे. या संविधानांचा अभ्यास सर्वानी करावा आपल्या नातवाबरोबर घरी संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे. आपणही आपल्या परिवारासह संविधान दिन साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले तसेच पत्रकार सिध्दार्थ मेहरखांब यांनी महाराष्ट्र माझा चँनलला शुभेच्छा दिल्या आहे.माजी कृषी अधिकारी गंगाधर कदम यांनी बिपिन गायकवाड यांच्या पत्रकारीतेच्या माध्यमातून अनेक नागरिकांचे प्रश्न सोडवितांना मी अनेक वेळा बगीतले आहे.असे प्रतिपादन केले.अनेक मान्यवरांनी महाराष्ट्र माझा या नविन पोर्टलला शुभेच्छा देत भारतीय संविधान दिन मोठ्या उत्सहात साजरा केला या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भारतीय बौध्द महासभेचे महाराष्ट्रचे उपाध्याक्ष राजेद्रं मेहरखांब यांनी केले आहे.



यावेळी नगरसेवक हाजीमेहमुदभाई नगरसेवक अजिजभाई नालंदा बुध्द विहार कमेटिचे रमेशजी गवळी सर रत्नाकर गायकवाड गुरुजी साई आर्टचे सतिशशेठ गुजराथी लाख गंगा गावचे सरंपच दिगंबरजी तुरकने महाराष्ट्र शाॕकपचे मालक पत्रकार युसुफभाई रंगरेज पत्रकार मोबिनभाई पत्रकार सोमनाथजी सोनपसारे पत्रकार शैलेश शिंदे पत्रकार संतोष जाधव पत्रकार अजय विघे पत्रकार लक्ष्मण जावळे पत्रकार सिध्दार्थ मेहेरखांब पत्रकार रविंद्र जगताप पत्रकार अमिनभाई शेख प्रेस फोटो ग्राफर हेमचंद्र भवर सामाजिक कार्यकर्ते दादा.पा.वक्ते जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी दुशिंग राहुलजी काळे रघुनाथजी शिंदे यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
