वारीच्या समस्या सोडवण्या साठी खासदार लोखंडे यांना निवेदन…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- शिर्डी लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांची वारी-कान्हेगावच्या समस्या सोडवण्यासाठी विनंती करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिशभाऊ कानडे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन निवेदन दिले वारीगाव तालुक्यातील पुर्व भागातील मोठे गाव असुन येथील कान्हेगाव रेल्वे स्टेशन थांबा रेल्वे प्रशासनाने अचानक बंद केल्याने ते पुर्ववत चालु करण्यात यावे व पुर्वीपासुन थांबणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या कान्हेगाव स्थानकात थांबवाव्यात तसेच वारी-कान्हेगाव संयुक्त पाणीपुरवठा योजना प्रलंबित कामात लक्ष द्यावे ,वारीच्या सर्व प्रलंबित रस्ते , नविन सभामंडप तसेच इतर विकास कामाचे संदर्भात सकारात्मक चर्चा करून निवेदन देण्यात आले
कोरोना संकटात निधी बंद असल्याने मतदारसंघात अनेक प्रलंबित कामे आहेत तसेच खासदार निधी मर्यादित असल्याने मतदारसंघात सर्वच तालुक्यांचा विचार करून काम करावे लागते यापूर्वी वारीला हायमॅक्स दिलेले आहेत
यापुढेही खोटे आश्वासन न देता सर्वच प्रश्नांमध्ये व्यक्तिशः लक्ष घालुन वारीच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे खासदार लोखंडे यांनी आश्वासन दिले
वारीच्या शिष्टमंडळाचे वतीने खासदार साहेबांचा यावेळी शाल पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी वारीगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिशभाऊ कानडे, उपसरपंच विशालभाऊ गोर्डे, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाशराव गोर्डे,माजी पंचायत समिती सदस्य तथा कोपरगाव तालुका शिवसेना सचिव अशोकराव कानडे ,ग्रामपंचायत सदस्य अनिलभाऊ गोरे , प्रशांतभाउ संत, पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेशभाउ कुलकर्णी यांचे सह ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *