
कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्यातील वडगाव येथील शनेश्वर महाराजांच्या यात्रेनिमीत्त शनेश्वर क्रिकेट क्लबच्यावतीने भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्याचे पहिले (२१हजार) बक्षीस येसगावच्या साई इलेव्हन संघाने पटकावले, सदरचा बक्षीस वितरण समारंभ सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांच्या हस्ते करण्यात आला.

चांदेकसारे क्रिकेट क्लबने दुसरे (१५हजार), तर शनेश्वर क्रिकेट क्लबने तिसरे (७ हजार) बक्षीस मिळविले आहे. खेळामुळे जीवनाला विशेष आकार मिळतो, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सातत्याने तालुक्यातील प्रत्येक खेळाला प्रोत्साहन देऊन त्याप्रमाणे खेळाडू घडविण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्याचे काम सुरू ठेवले आहे असे प्रतिपादन उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी यावेळी बोलताना केले.
याप्रसंगी सर्वश्री. कैलासराव माळी, संचालक मनेष गाडे, अशोक भाकरे, शेतकरी सहकारी संघाचे संचालक बाजीराव मांजरे, विजय साळुंके, उपसरपंच मनोज गाडे, उपसरपंच चासनळी, सुनिल सुरभैय्या, विश्वनाथ बारगळ संचालक कुक्कुटपालन विश्वनाथ बारगळ, भाजपा आेबीसी मोर्चा संघटक दौलतराव सोनवणे, भाजप युवा कार्यकारीणी सदस्य संदिप बारगळ , बुथ प्रमुख भाजपा कार्यकारीणी सदस्य गोविंद कांगणे,जनार्दन कांगणे, प्रदिप कांगणे, गोकुळ सांगळे, नितिन बारगळ, ऋषिकेश बारगळ, चांगदेव बारगळ, अनिकेत बारगळ, अभिषेक बारगळ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
