कष्टाळू व प्रामाणिक तेली समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मागे हटणार नाही:- आमदार आशुतोष काळे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- राजकीय व सामाजिक क्षेत्रात ज्या-ज्या वेळी संधी उपलब्ध होतील त्या त्यावेळी काळे परिवाराने त्या त्या समाजाच्या समाजबांधवाना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. काळे परिवाराचे हे बाळकडू मला माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांच्याकडून मिळाले आहे. तेली समाज संख्येने जरी कमी असला तरी हा समाज कष्टाळू, प्रामाणिक, एकनिष्ठ व दिलेल्या शब्दाला जागणारा असून तेली समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कधीही मागे हटणार नाही अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
कोपरगाव शहरातील कर्मवीर नगर येथे श्री. संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा व समाजमंदिराच्या सभामंडपाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब लुटे होते. यावेळी बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर,ज्येष्ठ समाजसेवक नारायणराव लुटे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष गजानन शेलार, महासचिव प्रा.डॉ.भूषण कर्डीले, शिवसेना उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र झावरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक मंदार पहाडे, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, ट्रस्टचे अध्यक्ष रमेश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, संपूर्ण तेली समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या संत जगनाडे महाराजांच्या नावाने कोपरगाव शहरात तेली समाज बांधवानी श्री. संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्थापन करून या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक समाजोपयोगी कामे केली केली आहेत. कोरोना संकटात देखील निराधार व्यक्तींना मदत करण्याचे काम करून संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. श्री. संत जगनाडे महाराजांच्या सामाजिक कार्याची परंपरा पुढे सुरु राहावी यासाठी त्यांच्या नावाने समाजमंदिर बांधण्याचा उपक्रम कौतुकास्पद असून त्या माध्यमातून श्री. संत जगनाडे महाराजांचे समाजकार्य चिरंतन राहणार आहे. अशा समाजोपयोगी उपक्रमासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही. सर्व समाजबांधवानी नि:संकोचपणे आपल्या अडचणी मांडाव्या आपण त्या अडचणी निश्चितपणे सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. यावेळी बोलतांना आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, आमदार आशुतोष काळे व मी विधानसभेतील समवयस्क सहकारी असून त्यांच्या कामाची पद्धत व त्यांनी आजवर सामाजिक कार्यात उमठविलेला ठसा पाहता या समाज कार्यासाठी कधीच कोणतीही कमतरता भासणार नाही असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी विद्यार्थी अध्यक्ष स्वप्नील पवार, राहुल देवळालीकर, राजेंद्र वाकचौरे, संतोष शेलार, कार्तिक सरदार, संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट कोपरगावचे अध्यक्ष रमेश गवळी, सचिव रामदास गायकवाड, खजिनदार राजेंद्र राऊत, विश्वस्त सुरेश राऊत, विलास वालझाडे, संतोष शेलार, राजेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर लोखंडे, आनंद शेलार, प्रशांत लुटे, सुमित क्षीरसागर, सुमित सोनवणे, संतोष सोनवणे, राजेंद्र वलझाडे, महेश आंबेकर, गोरख देवडे, बाबासाहेब चौधरी, बाबासाहेब कर्डीले आदींसह तेली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – कोपरगाव येथे संत जगनाडे महाराज समाजमंदिराच्या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन करतांना आ. आशुतोष काळे समवेत आमदार संदीप क्षीरसागर व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *