

कोपरगाव प्रतिनिधी:- रविवार दि.२१/११/२१ रोजी वंचित बहुजन आघाडी व आनंदऋषीजी नेत्रालय (अहमदनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व अल्पदारात मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले.


या कार्यक्रमाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते बाजीराव रनशूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्याच प्रमाणे वंचित चे नेते शरद खरात यांनी प्रास्ताविक करताना आपल्या भाषणात म्हंटले की रक्त गट कोणता ही असो रक्तात माणुसकी असली पाहिजे…अशोकाच्या झाडाच्या पाना सारखे गळून… फक्त कचरा बनवू नका… तर महेंदिच्या पाना सारखे बना…जे स्वतःला कुस्करून दुसऱ्याच्या आयुष्यात रंग भरतात…आशाच प्रकारचे रंग भरण्याचे काम आनंदऋषीजी नेत्रालय करत आहे.


या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विशालजी कोळगे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी व प्रवीण आल्हट युवा जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, अनिल बनसोडे जिल्हा संघटक, चैतन्य खरात, पै. साईनाथ जाधव, रामा कोपरे, संजय कोपरे, विजय कासलीवाल, सुरेश त्रिभुवन, सचिन बागुल, संतोष गडाख, ऋषिकेश त्रिभुवन, प्रभाकर थोरात, अजय निकम, किरण बोरुडे, किरण कोळगे, सुनील वाहूळकर, विशाल बनसोडे, किशोर पठारे,नानासाहेब सकट, नितीन मोरे,आदित्य गोडगे तसेच महिला आघाडीच्या सुनीता मुनतोडे, मंगल पगारे, शीतल लोणारे, सविता वाघ, छाया मराठे, रुखमींनी माळी, प्रतिषा वाघ इत्यादी हजर होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. राजेंद्र भालेराव, डॉ.किरण नेटारे, डॉ.रवींद्र भालेराव, प्रेम निकम, महिमा भालेराव, सुहासनी लकारे, अश्विनी लकारे, हिना पठाण, सारिका भालेराव, दिलीप भालेराव, करिश्मा निकम, या वेळी आनंदऋषीजी नेत्रालय स्टाफने विशेष मेहनत घेतली. या प्रमाणे या शिबिराचा लाभ 237 गरजूनी घेतला व 57 जणांनी अल्पदरात नंबर चष्मे घेतले व त्याच मोतीबिंदू शस्रक्रिया साठी 22 जणांनी नोंद केली अशा प्रकारे सर्व उपस्तितांचे व डॉक्टर, नर्स व सर्व स्टाफचे आभार विजय कासलीवाल यांनी मानले.


