
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना किंवा अन्य कारनामुळे पालक गमावलेल्या राहुरी तालुक्यातील ० ते १८ वयोगटातील १००% एकल बालकांपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या बाल संगोपन योजनेचा लाभ पोहचविणेसाठी तालुक्यातील सर्व शाळांची मदत घेणेत यावी आणि राहुरी तालुक्यात बालसंगोपन योजनांचे फॉर्म भरून घेणेसाठी दुबार शिबीर आयोजित करण्यात यावे आदी विषयावर दि. १५ नोव्हेंबर रोजी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक आप्पासाहेब ढुस व प्रशांत कराळे यांनी राहुरी पंचायत समिती कार्यालय येथे तालुका महिला व बाल विकास विभागाचे मा. राऊत साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले.
आत्तापर्यंत राहुरी तालुक्यातील जवळपास १८५ मुलांचे फॉर्म भरून घेऊन त्यास जिल्हा महिला व बाल विकास समितीचे अध्यक्ष मा. हनिफ शेख सर यांनी मान्यता दिली असून कोरोना एकल महिला पुनर्वसन
