
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव येथील प्रगतशिल शेतकरी नारायण गणपत रानोडे (८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सतिष, विलास दोन मुले, पत्नी, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय जनता पक्ष किसान आघाडीचे शहराध्यक्ष सतिष रानाडे तर सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या माजी संचालिका सौ. अनिता बाळासाहेब शेटे यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाबद्दल माजीमंत्री शंकरराव कोल्हे, अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या सचिव स्नेहलता कोल्हे, उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी, तालुकाध्यय साहेबराव रोहोम आदिंनी शोक व्यक्त केला.
