गावातील तंटे गावातच मिटवा:- न्यायाधीश जे एम पांचाळ…

कोपरगाव

वारीत विधी साक्षरता शिबीर उत्साहात…
कोपरगाव प्रतिनिधी:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारत सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कायद्या विषयक जनजागृती शिबीर तालुक्यातील वारी येथे उत्साहात संपन्न झाले


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर माननीय जे एम पांचाळ साहेब होते याप्रसंगी त्यांनी वारीच्या तरूण विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला विद्यार्थ्यांच्या मनातील कायद्याच्या बाबतीत असलेली भीती त्यांनी दूर करत कायद्याच्या बाबतीत भीती न बाळगता जागृत असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून सर्वांना अधिकार दिले आहेत घटनेचा सर्वांनी अभ्यास करावा आणि गावातील तंटे गावातच मिटले पाहिजे या करीता गावकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असे सांगुन या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामीण जिवनाचा जवळुन अनुभव आल्याचे सांगितले चांगल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करीत वारी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांचे कौतुक केले
प्रास्तविक अँड अमोल टेके यांनी तर स्वागत अँड शरद जोशी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे यांनी केले यावेळी अँड बागुल यांच्या टीमने पथनाट्य सादर करून जुन्या अनिष्ठ रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी प्रबोधन केले कोपरगाव ग्रामीणचे उपपोलीस निरीक्षक भरत नागरे ,कोपरगाव तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड एस बी लोहकने ,अँड सुयोग जगताप ,अँड अमोल टेके, अँड शरद जोशी यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले तर रामेश्वर दूध उत्पादक संघाचे चेअरमन वारीचे ज्येष्ठ नेते नामदेवराव जाधव, वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीश भाऊ कानडे यांचे हस्ते वारीचा मानाचा फेटा बांधुन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला
ग्रामपंचायत सदस्य विजय गायकवाड ,प्रकाशराव गोर्डे, सुवर्णाताई गजभिव, प्रशांत संत ,पत्रकार फकीर टेके ,ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, तलाठी कुसाळकर ,पर्यवेक्षिका श्रीमती गायकवाड कान्हेगावच्या सरपंच संगीताताई आहेर, उपसरपंच बाळासाहेब काजळे, रामदास सोनवणे ,ताराचंद सात्रळकर, कचेश्वर आहेर ,सर्व आशा सेविका ,अंगणवाडी सेविका,रामेश्वर विद्यालय वारीचे मुख्याध्यापक पाळंदे सर, कैलास शेळके सर, तुपेसर ,जोर्वेकरसर ,सोनवणेसर कृष्णराव जाधव आदिसह ग्रामस्थ विध्यार्थी विध्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *