महाविकास आघाडी सरकारची कामे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा:- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (सटाणा/अंबासन):- महाविकास आघाडी सरकारची कामे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांनी केले आहे.

अंबासन ग्रामपंचायत व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप आहिरे यांच्या संयुक्त विद्यमाने अंबासन येथील सावता महाराज सभागृहात शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून देण्याचे शिबीर संपन्न झाले यावेळी ते बोलत होते.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच मोठ्या प्रमाणावर इंधन दरवाढ झाल्याने महागाई वाढली असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांनी यावेळी बोलतांना केला.

नवीन रेशन कार्ड काढून देणे, जुन्या रेशन कार्ड मधील नावे कमी-जास्त करणे, रेशनकार्ड वरील पत्ता बदलणे, हरवलेले रेशन कार्ड नव्याने काढून देणे व पेन्शन योजनांसाठी लागणारी कागदपत्रे या शिबिराद्वारे तयार करून देण्यात येत आहेत. आगामी आठ दिवस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी गावात थांबून विविध योजनांसाठी लागणारी कागदपत्रे जमा करणार आहेत. या शिबिरात सहभागी झालेल्या सर्वांची कागदपत्रे अद्यावत करून देणार असल्याची माहिती या शिबिराचे आयोजक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप अहिरे यांनी दिली आहे.

कागदपत्रे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी दूर करून शासकीय कागदपत्रे तयार करून देण्यासाठी प्रयत्न करणारे संदीप अहिरे व त्यांच्या टीमचे कार्य कौतुकास्पद असल्याचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी यावेळी बोलतांना केले.

चौकट – सध्या कोणीही उठते आणि विचारते कॉंग्रेस व आघाडी सरकारांनी ७० वर्षात काय केले ? त्यांना नम्रपणे सांगावेसे वाटते कि सध्याचे मोदी सरकार जे-जे विकत आहे ते-ते सर्व कॉंग्रेस आणि समविचारी आघाडी सरकारांनी तयार केले होते असे देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार, माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस संदीप आहिरे, खेमराज कोर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे निरीक्षक सुनील आहेर, तालुकाध्यक्ष सम्राट काकडे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुयोग अहिरे, इतर मागासवर्गीय सेलचे जिल्हा सरचिटणीस उजेंद्र आहिरे, शशी कोर, चारुदत्त खैरनार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नामपूर शहराध्यक्ष मेघदीप सावंत, प्रसाद दळवी, तालुका उपाध्यक्ष विशाल मांडवडे, नितीन काकडे, एम.एस.पाटील, दीपक गरुड, भाऊसाहेब भामरे, नारायण कोर, संजय कोर, प्रवीण भामरे, लोटन अहिरे, नामदेव कोर, निवृत्ती अहिरे, योगेश कोर, देवमन अहिरे, वामन कोर, सुभाष ततार, सुखदेव अहिरे, पितांबर कोर, शंकर शेलार, साहेबराव कोर, पांडुरंग अहिरे, दीपक कोर, केदारनाथ सोनवणे, गणपत अहिरे, हिरामण अहिरे, हेमंत कोर, मधुकर सोनवणे, निलेश कोर, खंडू अहिरे, प्रशांत सोनवणे, रोहन कोर, धोंडू अहिरे, सतीश कोर, राघो अहिरे, बाजीराव अहिरे, सुभाष गरुड, दादाजी अहिरे, पुंडलिक शेलार, सदाशिव अहिरे, शांताराम अहिरे, विठल अहिरे, सतीश अहिरे, मधुकर अहिरे, सखाराम अहिरे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी:- अंबासन येथे आयोजित शासकीय कागदपत्रे काढून देण्याच्या शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार. समवेत माजी आमदार संजय चव्हाण, पुरुषोत्तम कडलग, शैलेश सूर्यवंशी, संदीप आहिरे, सम्राट काकडे, खेमराज कोर, एम.एस.पाटील, सुयोग अहिरे, शशी कोर, उजेन्द्र अहिरे आदी दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *