सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्याचा ५९ वा गळीत हंगाम २६ ऑक्टोंबर रोजी..!

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ५९ व्या हंगाम २०२१.२२ गळीताचा शुभारंभ मंगळवार दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता माजीमंत्री, संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक शंकरराव कोल्हे, कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे प्रमुख उपस्थितीत, भाजपाच्या प्रदेश सचिव, मा. आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली, कारखान्यांचे विद्यमान संचालक संजयराव होन, सौ. लताताई संजयराव होन या उभयतांच्या हस्ते कोरोना नियमांचे पालन करून होत असल्याची माहिती उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे व कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी दिली.
तरी या गळीत हंगामाच्या कार्यक्रमांस सभासद, उस उत्पादक शेतकरी, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, हितचिंतक, विविध संस्थांचे कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तज्ञ संचालक विवेकभैय्या कोल्हे, कारखान्यांचे संचालक मंडळातील सदस्य निवृत्ती बनकर, साहेबराव कदम, ज्ञानेश्वर परजणे, फकिरराव बोरनारे, भास्करराव भिंगारे, अरूणराव येवले, अशोकराव औताडे, सोपानराव पानगव्हाणे, राजेंद्र कोळपे, शिवाजीराव वक्ते, विलासराव वाबळे, मनेष गाडे, प्रदिप नवले, श्रीमती सोनुबाई भाकरे, संगिता नरोडे, मच्छिंद्र लोणारी, वेणुनाथ बोळीज, आदिंनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *