
कोपरगाव प्रतिनिधी:- मा . जिल्हाधिकारी , अहदमनगर यांचेकडील दिनांक ०८/१०/२०२१ चे आदेशानुसार अहमदनगर जिल्हयामध्ये लाळखुरकुत तसेच लंम्पी स्किन डिसीज या रोगाचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव वाढलेला असून सदर रोगाचा प्रादुभाव झाल्याने जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होऊन इतर आजारांची लागण झाल्याने जनावरे मुत्यूमुखी पडत आहेत . यामुळे पशुपालकांचे खुप मोठया प्रमाणावर आर्थीक नुकसान होते . सदरची साथ आटोक्यात न आल्यास राज्यातील दुध व दुधापासुन तयार होणारे उत्पादने यांची निर्यात थांबली जाऊन दुध व्यवसाय अडचणीत येईल याकरीता सदरचे रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हयातील लाळखुरकुत रोग आटोक्यात येईपर्यंत जिल्हयातील जनावराचे बाजार बंद ठेवणेबाबत कळविलेनुसार कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये भरविण्यात येणारा जनावरांचा आठवडे बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद राहील याची सर्व शेतकरी बांधव , जनावरे खरेदीदार व्यापारी यांनी नोंद घ्यावी अशी माहिती बाजार समितीचे सचिव श्री . नानासाहेब रणशूर यांनी दिली आहे .
