

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात शिवसेनेचे कार्य वाढत असुन शहरात विविध सामाजिक राजकीय धार्मिक कार्यक्रम राबवीत असुन नागरिकांच्या समस्या सोडवुन न्याय देण्याचे कामकाज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे.कोरोना काळात अनेक नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.गोर गरिबांच्या समस्या शिवसेनेच्या माध्यमातून सोडविल्या जातात.म्हणून कोपरगाव शहरातील तरूणांनी उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,शहर प्रमुख कलविंदर डडियाल,एस.टी.कामगार सेनेचे शहराध्यक्ष भरत मोरे.अस्लम शेख विधानसभा संघटक,इरफान शेख जिल्हा प्रमुख वाहतूक सेना,विकास शर्मा शहर उप प्रमुख ,बाळासाहेब सांळुके शहर संघटक,वैभव गिते शहर संघ संघटक,विशाल झावरे,विक्रांत झावरे,ऋषीकेष पवार,अमित भास्कर, वैभव हलवाई,ग्राहक संरक्षण मंचाचे राहुल देशंपाडे याच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे.याप्रसंगी शिवसेना एस.टी कामगार सेनेचे शहराध्यक्ष भरत मोरे म्हणाले की,शिवसेनेत अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार जातींचा समावेष आहे.शिवसेना पक्ष सर्वाना बरोबर घेवुन जातो.जातीपातीला काहीही महत्व देत नाही.विधानसभा संघटक अस्लमभाई शेख पुढे म्हणाले की,तुम्ही मुस्लिम समाजाचे आहात.तुम्ही भगवा घेतला असुन या भगव्याला तडा जावून देवु नका.अल्पसंख्यांक समाजाने भगवा अंगावर घेतला आहे.त्याला मानसन्मान दिलाच पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेनेत मुस्लिम मावळे होते ते एकनिष्ठ होते.त्यांची प्रेरणा घेवुन पक्षा बरोबर एकनिष्ठ राहा असे आवाहन अस्मल भाई शेख यांनी केले आहे.शहरप्रमुख कलविंदरसिंग डडियाल म्हणाले की,पक्षप्रमुख उध्दव ठाकरे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे त्याच बरोबर शिवसेनेतील सर्वच पदाधिकारी यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत आपण प्रवेश केला.आपले सर्वाचे स्वागत असुन.शिवसेना हि ८० % समाजकारण आणि फक्त २० % गरज पडल्यास राजकारण करते.त्यामुळे शिवसेनेत असंख्य तरुण प्रवेश करत आहे.शिवसेनेच्या सामाजिक कार्यामुळे प्रामुख्याने तरुणांचे आकर्षण वाढत असुन शिवसेना हा युवकांचा पक्ष बनत आहे.शिवसेना आणखी प्रबळ करण्यासाठी प्रत्येक वार्डात शाखा आणि घरात शिवसैनिक निर्माण करणार आहोत.जफर पठाण,राजु सय्यद,आसिफ पठाण,नईम पठाण,रवि शेजवळ,आक्रम शेख,समिर शेख,रिजवान शेख,रेहान शेख आदि तरूणांनी शिवसेनेत नवरात्रिच्या शुभ प्रसंगी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
