

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.५.ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध योग प्रशिक्षक श्री. अभिजितजी शहा यांच्याकडून महिलांना योगासने शिकवण्यास सुरुवात करण्यात आली. हे योग प्रशिक्षण शिबीर विजयादशमीपर्यंत सुरू असणार असून ‘जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रमाअंतर्गत प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी नगरसेविका सौ. प्रतिभाताई शिलेदार, सौ. रमाताई पहाडे, सौ. रश्मीताई कडू, सौ. सुनीताताई खैरनार, सौ. नेत्राताई कुलकर्णी, सौ. राठी मॅडम, योग प्रशिक्षक अभिजितजी शहा, उत्तमजी शहा, नारायणजी लांडगे, मनोजजी कडू, रमेशजी टोरपे आदी उपस्थित होते.
