सौ.संगिता ताई मालकर (रासकर) यांचे एम.सी.जे परीक्षेत यश…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षीका सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ संगिता ताई मालकर रासकर यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे
कोपरगाव तालुक्यात प्रथमच महिला या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आहेत सामाजिक सेवाभावी वृत्तीने सदैव समाजजागृती साठी योगदानाबद्दल अनेक वेळा त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे सध्या कोरोनाने मयत झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत व पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सामाजिक मदतीचा हात पुढे करून भरीव योगदान दिले आहे
त्यांच्या यशाबद्दल दिलीप अजमेरा कैलास ठोळे चंद्रकांत ठोळे विजय बंब डॉ दादासाहेब गलांडे हेमचंद्र भवर आदिंनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *