
कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहरातील विविध समाज बांधवांच्या मागणीनुसार विविध समाजाचे सामाजिक सभागृह, मंदिर सुशोभिकरण तसेच कब्रस्थान व दफनभूमीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी भरघोस निधी देऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रभाग क्र. ६ मधील पुतळ्याचे सुशोभिकरण करणेसाठी १० लाख, मुस्लीम समाजासाठी प्रभाग क्र. १२ मधील नगरपरिषद हद्दीतील सर्वे नं. १०५ मधील हनुमान नगर भागातील कब्रस्थान दुरुस्ती व सुशोभीकरण करणे १० लाख, प्रभाग क्र. १ मधील मौजे खडकी ते मदरसा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १० लाख, प्रभाग क्र. १४ मधील नगरपरिषद हद्दीतील सर्वे नं.१०५ मधील गजानन नगर येथील कब्रस्थान दुरुस्ती व शुशोभीकरण करणे १५ लाख, बौद्ध समाजासाठी प्रभाग क्र.३ मधील नगरपरिषद हद्दीतील लुंबिनी बुद्धविहार कडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे १५ लाख, चर्मकार समाजाचे मागणीनुसार प्रभाग क्र. ८ मधील नगरपरिषद हद्दीतील सर्वे नं.२१४ मध्ये संरक्षक भिंत बांधणे १० लाख, ख्रिश्चन समाजाच्या प्रभाग क्र.८ मधील ख्रिश्चन दफन भूमी मध्ये संरक्षण भिंत व सोयी सुविधा करणे १० लाख, माळी समाजासाठी प्रभाग क्र. १३ मधील नगरपरिषद हद्दीतील सि.स.नं. १९२९ मध्ये नवीन छत व सुशोभीकरण करणे १० लाख, लिंगायत समाजासाठी प्रभाग क्र.१ मधील नगरपरिषद हद्दीतील समता नगर सर्वे नं.१९८ मध्ये सामाजिक सभागृह बांधणे १० लाख, सुतार समाजासाठी प्रभाग क्र.२ मधील नगरपरिषद हद्दीतील सर्वे नं.२०२/१६३ मध्ये सामाजिक सभागृह बांधणे १० लाख, शिंपी समाजासाठी प्रभाग क्र.२ मधील नगरपालिका हद्दीतील सुभद्रानगर येथील २०४/२९४ मध्ये सामाजिक सभागृह बांधणे १० लाख, नाभिक समाजासाठी प्रभाग क्र ५ मधील सि.स.नं.९०६ मध्ये सामाजिक सभागृह बांधणे १० लाख, सुवर्णकार समाजासाठी प्रभाग क्र. ५ मधील सि.स.नं. ८८९ मध्ये सामाजिक सभागृह बांधणे १० लाख, तेली समाजासाठी प्रभाग क्र. ९ मधील नगरपरिषद हद्दीतील सर्वे नं.११८/२२ मध्ये सामाजिक सभागृह बांधणे १० लाख, ब्राम्हण समाजासाठी प्रभाग क्र. १० मधील नगरपरिषदेच्या सर्वे नं. ११२ /१२ मध्ये सामाजिक सभागृह बांधणे १० लाख, परीट समाजासाठी प्रभाग क्र. १३ मधील नगरपरिषद हद्दीतील सर्वे नं. १०५ मधील गजानन नगर भागामध्ये सामाजिक सभागृह बांधणे १० लाख, कुंभार समाजासाठी प्रभाग क्र. १३ मधील नगरपरिषद हद्दीतील सर्वे नं. १०५ मधील गोरोबा नगर भागामध्ये सामाजिक सभागृह बांधणे १० लाख, कहार समाजासाठी प्रभाग क्र. १४ मधील नगरपरिषद हद्दीतील ७२/१ मध्ये सामाजिक सभागृह बांधणे १० लाख अशा प्रकारे सर्वच समाजबांधवांची मागणी आ.आशुतोष काळे यांनी पूर्ण केली असून वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत कोपरगाव नगरपरिषदेकडे हा निधी वर्ग करण्यात आला आहे.
निवडणुकीपूर्वी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील पाणी प्रश्नासह मुलभूत विकासाचे प्रश्न सोडविण्याचे वचन जनतेला दिले होते. दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी निवडून येताच त्यांनी पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदकाम पूर्ण केले आहे.पुढील कामासाठी निधी मिळावा यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. त्याचबरोबर कोपरगाव शहराच्या विकासासाठी त्यांनी आजपर्यंत १२ कोटी रुपये निधी मिळविला आहे. विविध समाजबांधवांना त्यांच्या समाजाप्रती अभिमान असतो. आपल्या समाज बांधवांना एकत्र येवून समाजाच्या प्रश्नाविषयी एकत्र येवून विचारविनिमय करण्यासाठी सामाजिक सभागृह असावे असे प्रत्येक समाजातील नागरिकांची अपेक्षा होती. हि अपेक्षा आमदार आशुतोष काळे यांनी पूर्ण केल्यामुळे कोपरगाव शहरातील समाजबांधवांनी त्यांचे आभार मानले आहे.
