जागवूया ज्योत माणुसकीची:- विवेक भैय्या कोल्हे व सर्व युवासेवक (संजीवनी युवा प्रतिष्ठान)…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
“संकट आले की माणूस खचतो,दुःखात कोसळतो मात्र जर आधार देणारी माणसे धावून आली तर संकटांना सामोरे जाण्याची जिद्द काळजात उसळते व साकारला जातो.माणूसकीच्या नव्या अध्यायाचा प्रत्ययच पुरग्रस्तांना मदत व सेवाकार्याची मोहीम संजीवनी युवा प्रतिष्ठानने राबविली त्यात आला..!!”

संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण येथील पुरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी धावून गेलेल्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवासेवकांची मेहनत आणि सामाजिक जाणिवेची प्रगल्भता पाहून अक्षरशः नागरिकांना भारावून आले,भर पावसात मदतकार्य सुरू होते,अनेकांना घरा घरात जाऊन मदत मिळत होती,सेवा हेच कर्म आणि कर्तव्य हाच आमचा धर्म या भावनेने पुरग्रस्तांच्या काळजाला हात घालण्याचे काम या सेवाकार्याने केले..!!

जीवनावश्यक वस्तूंचे किट बनवणे,साहित्य उचलणे,पाऊस चिखल यात स्वतःची पर्वा न करता मदतीला धावून जाणे हा सेवाभाव कोकणाच्या लाल मातीत सर्वांना प्रेरणा देत होता,संजीवनी युवा प्रतिष्ठान हे मुळातच जगवूया ज्योत माणूसकीची या विशाल दृष्टीकोनातून काम करणारे संघटन आहे.कोपरगावकरांनी केलेले सेवाकार्य हे फक्त मदत म्हणूनच नाही तर कर्तव्य म्हणूनही सर्वांना मार्गदर्शक आहे..!!

सर्व युवासेवक
(संजीवनी युवा प्रतिष्ठान)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *