
कोपरगाव प्रतिनिधी:- अन्न,वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि गेल्या कित्येक वर्षापासून सरकार ही या गोष्टी वर काम करत आहे परंतु आजही काही निराधार लोकांचे हाल सुरू असून आपण पाहत आहोत ज्या लोकांना मुलं नाहीत त्यांचे उत्पन्नाचे साधन काही च नाही,अशा लोकांना राहण्याचा प्रश्न मुश्किल झाला आहे,काही निराधार लोकांना घराचे छत्र नाही, छत्र गळके आहे असे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्या सर्व लायन्स लिओ सदस्यांना विनंती केली आणि आव्हान केले की आपआपल्या परीने मदत करायला हवी आणि काही वेळेतच भरघोस असा प्रतिसाद आम्हाला आमच्या सर्व सदस्यकडून मिळाला आणि आज सरासरी वीस हजार रुपये किमतीचे ताडपत्री वाटप आमच्या सर्व सदस्य कडून करण्यात आले. या निराधार लोकांना छत मिळाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंद पाहून आम्हाला प्रचंड समाधान मिळत आहे असे लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष राम थोरे यांनी म्हटले आहे.
लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व लीओ क्लब ऑफ कोपरगाव च्या वतीने येथील निराधार गरजू लोकांना ज्यांच्या घराचे छत गळके आहे त्याना घराच्या छतासाठी ताडपत्री वाटप आज दिनांक 25 जुलै 2021 रोजी लायन्स पार्क येथे करण्यात आले. यावेळी 15 गरजूंना ताडपत्री वाटप करण्यात आले तर काहींना त्याच्या घरी जाऊन ताडपत्री देण्यात येणार असल्याचे थोरे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सुमनबाई थोरात संजय नगर, मिराबाई साठे सुभाष नगर, छाया वालेकर सुभाषनगर, विमल जाधव सुभाष नगर, रमाबाई पगारे सुभाषनगर , मंगलाबाई चंदनशिव सुभाष नगर, संतोष शिंदे सुभाष नगर,सागर रीळ सुभाषनगर, इंदूबाई पंडित संजय नगर, काशिनाथ पाटोळे , राधाबाई ताकवले, मनीषा लोंढे कोर्ट रोड,सुमन कांबळे सुभाष नगर, हिराबाई शिरसाट, अनिल गायकवाड सुभाष नगर इत्यादी गरजूंना ताडपत्री वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित निराधार गरजूंनी लायन्स क्लब व लिओ क्लब ऑफ कोपरगाव चे आभार व्यक्त केले.या स्तुप्त उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष राम थोरे,लिओ क्लबचे अध्यक्ष आदित्य गुजराती, लायन्स क्लबचे सेक्रेटरी अक्षय गिरमे , खजिनदार सुमित भट्टड,लिओ क्लब चे सेक्रेटरी पृथ्वी शिंदे,खजिनदार ध्रुव कुदळे,सुरेश शिंदे,मनोज कडू,प्रसाद भास्कर, राजभाई पटेल प्रोजेक्ट चेअरमन पंकज ठोळे व देवेन चोपडा
आदीजन यावेळी उपस्थित होते
