एमएच ३५७ (MH 357) या कंपनीद्वारे बनवण्यात आलेल्या हॉस्पिटलोम या अॅपची निर्मीती प्रीतमजी महावीर संघवी यांनी केली व त्याचा शुभांरभ आमदार काळेंच्या हस्ते करण्यात आला..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव मध्ये प्रथमच एमएच ३५७ (MH 357) या कंपनीद्वारे बनवण्यात आलेल्या हॉस्पिटलोम या अॅपचा शुभारंभ दिनांक २० जुन रोजी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या अॅपच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील सर्व डॉक्टर्स व हॉस्पिटल्सविषयी सर्व माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. अॅपचे निर्माते प्रीतमजी महावीर संघवी यांनी महाराष्ट्रातील सर्व ३५७ तालुक्यांसाठी हे अॅप सुरू करण्याचा संकल्प केला असून त्यांच्या या कामासाठी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलभाऊ गंगूले, नगरसेवक मंदारजी पहाडे, राजेंद्रजी वाकचौरे, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनीलजी शिलेदार, डॉ. भरतजी संघवी, डॉ. विजयजी संघवी, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णाजी फुलसुंदर, डॉ. चंद्रशेखरजी आव्हाड, डॉ. राजेंद्रजी चीने, डॉ. योगेशजी कोठारी, डॉ. मयूरजी जोर्वेकर, डॉ. मयूरजी तिरमखे, डॉ. आतिषजी काळे, डॉ. कुणालजी घायतडकर, डॉ. सुनीलजी लोढा, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषारजी पोटे, फकीरमामु कुरेशी, दिनकरजी खरे, राहुलजी देवळालीकर, जावेदभाई शेख,
अॅड. मनोजजी कडू, गणेशजी लकारे, वाल्मिकजी लहिरे, धनंजयजी कहार, संदीपजी देवळालीकर, इम्तियाजभाई अत्तार, जुनेदभाई शेख, संतोषजी बारसे, नितीनजी जोरी, अमोलजी देवकर, विलासजी नरोडे, गोरखजी कानडे, प्रतापजी गोसावी, महेशजी उदावंत, योगेशजी वाणी, रवींद्रजी छाजेड, जितेंद्रजी छाजेड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *