
१२ वर्षांच्या मनस्वी मंदार आढाव हिने निर्मिती केलेल्या कोपरगाव तालुक्यातील वैद्यकीय सेवेची माहिती देणारा KoCARE ॲपचे लोकार्पण…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना कोविड आणि कोविड व्यतिरिक्त आजारांवर इत्यंभूत माहिती देणारा को-केअर ॲपचे माध्यमातून तिसरी लाटेत कोरोना रुग्णांना दिलासा मिळेल.कु.मनस्वी आढाव हिने को-केअर ॲपचे निर्मितीतून कोविड हाॅस्पिटल आणि रुग्णसेवेशी निगडित इतर माहितीचे नागरिकांना उपलब्ध केलेले दालन कौतुकास्पद असल्याचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.
कोपरगाव तालुक्यातील कु.मनस्वी मंदार आढाव या १२ वर्षांच्या लहान मुलीने कोपरगाव तालुक्यातील वैद्यकीय सेवेची माहिती देणारा KoCARE ॲप तयार केला आहे.
या ॲपचे लोकार्पण शिर्डी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर,कु.मनस्वीची आजी प्रगतशील शेतकरी सौ.रंजनाताई आढाव, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके,मंदार आढाव,सौ.जान्हवी आढाव,कु.राजहंस आढाव उपस्थित होते.

कु.मनस्वी ही कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष व मराठा पंच मंडळाचे अध्यक्ष अॅड.शंकरराव आढाव यांची नात असून प्रसिद्ध उद्योजक वैभवराव आढाव यांची पुतणी आहे.
कु.मनस्वी हीने सदर ॲप तयार करतांना एक महिना माहिती संकलन आणि मेहनत घेतली आहे.या कामात कु.मनस्वी हीस हैदराबाद येथील व्हाईट हॅट ज्युनिअर मार्गदर्शक शिक्षिका मोनिका सिंग, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर,आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

को केअर ॲपचे निर्मिती बद्दल कु.मनस्वी व तीचे वडील मंदार आढाव यांचा उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी शाॅल देवून सन्मान करण्यात आला.
को केअर केअर ॲप मध्ये नियंत्रण कक्ष फोन नंबर, कोपरगाव तालुक्यातील कोविड रुग्णालय, तेथील फोन नंबर,कोविड व्यतिरिक्त ईतर आजारांवर उपचार करणारे रुग्णालय,एच.आर.सि
टी.स्कॅन ठिकाण,रक्तपेढी, कोपरगाव रुग्णवाहिका माहिती, कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र यासह आरोग्य विषयक निगडित माहिती सदर ॲप मध्ये असणार आहे.
कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना रुग्णसेवेसाठी ko CARE ॲप सेवा मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल कु.मनस्वी हिचे कौतुक उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, तहसिलदार योगेश चंद्रे, कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव,शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, भारतीय वैद्यकीय संघटना कोपरगाव शाखेचे अध्यक्ष डॉ.महेंद्र गोंधळी, सचिव डॉ.योगेश कोठारी यांचे सह नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
