
कोपरगाव प्रतिनिधी :- साईबाबांच्या कृपाआशीर्वादाने सुरू असलेल्या सबका मालिक एक प्रतिष्ठान संचलित साईआश्रया परिवार शिर्डी येथे साईच्या पावन भूमीत साईआश्रया येथे श्रावण मासानिमित्त साईचरित्र पारायण सोहळा व साईकथा ज्ञानयज्ञ वर्ष दुसरे दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी दिनांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी 10 वाजता मा. कशिकानन्द महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले आहे






यानंतर शिर्डीतील मान्यवर मा. कमलाकर साहेब कोते पा, मा. संजयआप्पा शिंदे पा, मा.निलेश दादा कोते पा, मा. अनुपभाऊ गोंदकर पा, सचिनभाऊ तांबे पा. मा. अशोक भाऊ गायके पा, राजुभाउ जाधव , मयूर दागट मा. शंकर भाऊ गोंदकर पा, दिल्ली चे साई भक्त अनिलजी गुप्ता यांच्या हस्ते दीप प्रज्वलंन व साईबाबांची आरती करण्यात आली अशा प्रकारे खूप छान व आनंदाने साई भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली त्याच बरोबर साईआश्रयातील युवराज व अविनाश यांनी 12 वी मध्ये चागले गुण मिळून उत्तीर्ण झाले तेव्हा या शुभ प्रसंगी त्याचा गुणगौरव सन्मान सागर राजू जाधव प्रतिष्ठान च्या माध्यमातून करण्यात आला आहे तेव्हा पारायनाची वेळ सकाळी ९ ते ११ तसेच साईकथा संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत राहील तरी सर्व साईभक्तांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा तसेच साईलीला टीवी या वाहिनीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. ओम साई राम साई सेवक – गणेश दळवी
साईआश्रया परिवार शिर्डी
मो.नं. 9637549300 9421534001
