लक्ष्मी माधव प्रतिष्ठाणची संजीवनी कोविड सेंटरला आर्थीक मदत:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रूग्णांना दिलासादायक ठरलेल्या संजीवनी कोविड सेंटरला लक्ष्मी माधव प्रतिष्ठाणच्या वतीने मदत करण्यात आली. लक्ष्मी माधव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय गोरखनाथ आढाव व त्यांच्या सहका-यांच्या वतीने कै.गोरखनाथ माधवराव पा.आढाव यांच्या जयंती निमित्ताने अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक,विवेकभैया कोल्हे यांचेकडे मदतीचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.
सध्या देशासह राज्यात कोरेानाचा प्रादुर्भाव सुरू आहे.कोपरगाव तालुक्यातही याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने पुरेशा वैद्यकिय सुविधा मिळत नसल्याने रूग्ण व नातेवाईकांची धावपळ होते,सध्याच्या परिस्थितीतील गरज ओळखून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी या भागातील रूग्णांसाठी संजीवनी कोविड सेंटर सुरू केले. या ठिकाणी रूग्णांना औषधासह पौष्टीक आहार उपलब्ध करून दिला आहे.त्याचप्रमाणे रूग्णांना मिळणा-या सोयी सुविधा मिळत असल्याने रूग्ण बरे होण्यास मदत होत आहे.
माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांचा जनसेवेचा वसा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी पुढे सुरू ठेवला असुन ज्या ज्या वेळी तालुक्यावर संकट आले त्या त्या वेळी सर्वप्रथम संजीवनीची मदत मिळाली आहे. सध्याच्या कोरोना काळात विवेकभैय्या कोल्हे यांच्या पुढाकारातून सुरू केलेल्या कोविड सेंटरमुळे अनेक रूग्णांना याचा उपयोग झाला आहे. रूग्णांना येथे दिल्या जाणाऱ्या सुविधा अप्रतिम आहे.श्री.कोल्हे यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी असुन या समाज उपयोगी कार्यामध्ये आम्ही सदैव तुमच्या सोबत असल्याचे यावेळी श्री.विजय आढाव म्हणाले.यावेळी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान,संदीप देवकर, बाळासाहेब आढाव,संतोष नेरे,संतोप पवार,गौरव आढाव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *