सुरेगाव येथे अंमली पदार्थ गांजाची झाडे सह एक आरोपी 2,07,750/- रु.किं.चा मुद्देमालासह जेलबंद, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची कारवाई…

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक 03/07/2026 रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुरेगाव गावठाणात एक इसम नामे संजय महिमत रजपुत रा. सुरेगाव, ता. कोपरगाव हा त्याचे राहते घराचे शेजारी मोकळ्या जागेत सुरेगाव गावठाण, ता. कोपरगाव येथे अंमली पदार्थ गांजाची झाडे (कॅनबीस वनस्पती) ची लागवड करुन त्याची देखरेख करीत आहे. सदर ठिकाणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांनी पोलीस पथकासह जावुन सुरेगाव गावठाणात इसम नामे संजय महिमत रजपुत यांचे राहाते घराचे जवळ जावुन-पाहुन खात्री केली असता त्याचे घराचे जवळ अंमली पदार्थ गांजाची झाडे (कॅनबीस वनस्पती) ची लागवड केलेली आढळुन आली, सदर ठिकाणी त्याचे घरात कुणी आहे का, ते पाहुन आतमधील इसमास बाहेर बोलावले असता तो पोलीस पथकाला पाहुन घराबाहेर येवुन पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास जागीच पकडुन त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संजय महिमत रजपुत वय 45 वर्ष रा.सुरेगाव गावठाण, ता. कोपरगाव असे सांगितले. त्यास त्याचे घरालगत असलेले जागा व त्यावरील गांजाची झाडे हे कोणाचे आहे त्याबाबत विचारपुस केली असता त्याने ती जागा मीच वापरतो व ती झाडे मीच लावली असल्याचे सांगितले.
आरोपीच्या ताब्यातुन 2,07,750/- रु.किं.चे गांजाची झाडे (कॅनबीस वनस्पती) असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर आरोपी विरुध्द कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुरनं 285/2026 गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8(क), 20 (ब) 11 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा.श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मा. श्री सोमनाथ वाकचौरे, अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर, मा श्री अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड पोहेकॉ/मधुसुदन दहिफळे, पोना/रघुनाथ कारखेले, पोकों/अंबादास वाघ, पोकॉ/जयदिप गवारे, पोकों/राम खारतोडे, पोकों/अविनाश तमनर, पोकॉ रशिद शेख, पोकों/प्रकाश नवाळी व पोकों युवराज खुळे यांनी केली आहे.
