Uncategorized

आदिवासी उपयोजनेअंतर्गत तालुका कळवण येथे सोयाबीन बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ)
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत राष्ट्रीय बीज विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, मऊ, (उत्तर प्रदेश) यांच्याकडून प्राप्त निधीतून प्रमुख शास्त्रज्ञ, (बियाणे) बियाणे विभागाच्यावतीने बापखेडा येथे पंचक्रोशीतील कुमसाडी, वीरशेत, धनोली, जिरवाडे, शेपूपाडा, ततानी, चापापाडा, सुळे, भारडमोक आणि विठेवाडी, ता. कळवण, जि. नाशिक या आदिवासी क्षेत्रातील लाभार्थी शेतकर्यांना बियाणे वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या नेतृत्वाखाली तसेच संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. नरेंद्र काशीद यांच्या नियोजनाखाली बियाणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बियाणे विभागाचे बीजोत्पादन अधिकारी डॉ. कैलास भोईटे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी बियाणे विभागाचे विपणन अधिकारी डॉ. दिलीप ठाकरे, सहाय्यक बीजोत्पादन अधिकारी डॉ. कैलास गागरे, बापखेडा गावचे सरपंच प्रभू जाधव, कळवण कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय गायकवाड, पोलीस पाटील पांडुरंग चोपडे तसेच जिरवाडे गावचे आदिवासी विकास सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ गायकवाड व महिला सदस्य श्रीमती सुलेबाई गवळी उपस्थित होत्या.
यावेळी झालेल्या तांत्रिक मार्गदर्शनामध्ये डॉ. कैलास भोईटे यांनी आधुनिक सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व सुधारित बियाणे वापरल्यास शेतकर्यांच्या परिस्थितीत आर्थिक सुधारणा कशी होईल याविषयी उपस्थित लाभार्थी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. डॉ. कैलास गागरे यांनी सोयाबीन या पिकावरील बीजप्रक्रियेचे महत्त्व याविषयी माहिती दिली. यावेळी बियाणे विभागाच्या वतीने विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीनच्या फुले दूर्वा या सुधारित वाणाचे 170 क्विंटल बियाणे आदिवासी उपयोजनेअंतर्गत एकूण 654 आदिवासी शेतकर्यांना मोफत वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिलीप ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी प्रभाकर गायकवाड व बाबुराव गायकवाड यांचे नियोजन व सहकार्य तसेच बियाणे वाटपासाठी डॉ. बी. जी. राठोड, गणेश थोरात, वैभव कलापुरे, मंगेश अडसुरे, नवनाथ गायके, सुधीर पठारे, देवेंद्र पेरणे, कुशिनाथ अडसुरे व बापू पेरणे यांचे सहकार्य लाभले. यावेळी लाभार्थी शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *