संजीवनी पॉलीटेक्निकला राज्यस्तरीय डीपेक्स प्रकल्प स्पर्धेत प्रथम बक्षिस, संजीवनीच्या टेक्निकल इनोव्हेशनचा राज्य पातळीवर डंका…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी :-संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकने राज्यस्तरीय डिपेक्स प्रकल्प स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या निमीत्ताने संजीवनी टेक्नीकल इनोव्हेशनचा राज्यपातळीवर डंका वाजला. या चुरशीच्या स्पर्धेत कृषि वर्गवारीतील गटात संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘डेव्हलपमेंट ऑफ अॅग्रीकल्चरल पीटीओ ट्रॉली फॉर मल्टी युटीलिटी अप्लिकेशन्स’ या वर्किंग मॉडेलने पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले. अकरा हजार रूपये रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र हे या बक्षिसाचे स्वरूप आहे.
आखिल भारतीय विद्यार्थी परीषद व सृजन ट्रस्टच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे ही स्पर्धा संपन्न झाली. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील विविध विभागीय पातळीवरील विजेत्या स्पर्धकांनी त्यात सहभाग घेतला. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारा प्रकल्प सादर करून संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी एका अर्थाने संस्थेचे संस्थापक स्व.शंकरराव कोल्हे यांची स्वप्नपूर्ती केली. या स्पर्धेत विभागीय पातळीवर निवडलेले ३२ वर्किंग मॉडेल्स सहभागी झाले होते. तृतिय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या कृष्णा लक्ष्मीकांत गंभिरे, विवेक गजानन गायकवाड, ऋतिक बाबासाहेब गव्हाणे व चेतन दादासाहेब गायकवाड यांनी हा प्रोजेक्ट सादर केला. हे चारही विद्यार्थी शेतकरी कुटूंबातील असुन त्यांनी कृषी मालाची वाहतुक करताना येणाऱ्या समस्या अनुभवल्या आहेत. यातुन त्यांना या प्रोजेक्टची नाविन्यपुर्ण कल्पना सुचली. संस्थेचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर व संबंधित प्राद्यापक उपस्थित होते.
चौकट:
शेतातुन शेतमाल घेवुन येणाऱ्या ट्रॅक्टरद्वारे ओढणाऱ्या ट्रालीची पकड कमी होण्याची समस्या कच्च्या रस्त्यांमुळे निर्माण होते. संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ट्रॅक्टरच्या पावर टेक ऑफ (पीटीओ) शाफ्टचा वापर करून ट्रॉलीच्या चाकांना चालना देणारी पीटीओ संचालित ट्रॉली प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे ट्रालीला ट्रॅक्टर एवढीच शक्ती मिळते. शेतकऱ्यांना वरदान ठरणारा हा प्रकल्प आहे. ही प्रणाली जड भार वाहतूक करताना ट्रॅक्शन सुधारते, इंधनाचा वापर आणि मजुरी कमी करते तसेच कृषी आणि ग्रामीण वापरासाठी किफायतशीर, ऊर्जा-कार्यक्षम आणि मजबूत असा पर्याय उपलब्ध करून देते-कृष्णा गंभिरे, विद्यार्थी

फोटो ओळीः संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी राज्यस्तरीय डिपेक्स प्रदर्शन स्पर्धेत प्रथम विजेत्यांचा सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र. यावेळी प्राचार्य मिरीकर यांचे सह इतर संबंधित मान्यवर प्राद्यापक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *