
कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक 21/09/2025 ते दिनांक 31/10/2025 दरम्यान रवंदे गावातील फिर्यादी यांची १. कशीष सुकदेव भालेराव २. नम्रता सुकदेव भालेराव ३. भुमी किरण निकम सर्व रा जत्रा चौक, आडवा नाका ता जि. नाशिक ४. अशोक तान्हाजी काळे (पाहीजे) ५.वनिता अशोक काळे दोन्ही रा आंगणगाव ता येवला जि. नाशिक (पाहीजे) ६. गोकुळ चिंदा पानकर रा. मदरतेरेसा चौका जवळ, नाशिक जि.नाशिक अशांनी संगणमत करुन लग्नाचे अमिष दाखवुन 2,29,000/- रु.कि. रोख रुपये, सोने व चांदीचे दागिण्यांचा अपहार केला वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुरनं 60/2026 बी एन एस कलम 318(4),316(2),3(5) प्रमाणे दाखल केला होता. सदर गुन्हयाचा तपास चालु होता.
सदर गुन्हयाचा तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत असताना, आरोपी क्रमांक 01 ते 03 यांचा आडगाव नाका, जि. नाशिक येथे तपास केला असता, त्यांना शिताफिने ताब्यात घेतले होते. आरोपीना मा. न्यायालयात हजर करुन त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली होती. सदर आरोपींना पोलीस कोठडी दरम्यान गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस केली असता, आरोपींनी संगनमताने खोटे लग्न लावुन फसवणुक केली असल्याची माहिती दिली होती, आरोपीने गुन्हयातील फसवणुक करुन अपहार केलेले रोख रुपये, सोने व चांदीचे दागिने काढुन दिले असुन, जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा. श्री सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, मा. श्री अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदिप कोळी, पोना/आर.ओ. कारखेले, मपोकों ज्योती रहाणे, मपोहेकों/अनिता वलवे, पोकों/जयदिप गवारे, पोकों/अंबादास वाघ तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपुर (मोबाईल सेल) येथील पोहेको संतोष दरेकर, सचिन धनाड, राम वेताळ यांनी केलेली आहे.
