
कोपरगाव प्रतिनिधी:-
गेल्या काही दिवसांपासून लसीकरण करिता अनेकांना लसीच्या कमी पुरवठा आल्याने अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. याचे कारण पहिला डोस SJS हॉस्पिटल आणि आत्मा मालिक ह्या हॉस्पिटल मध्ये घेतला आहे. त्यांची यादी ग्रामीण रुग्णालय मध्ये उपलब्ध नव्हती. ती उपलब्ध करून ग्रामीण रुग्णालय, SJS हॉस्पिटल आणि आत्मा मालिक हॉस्पिटल या तिन्ही यादी एकत्र करून उपलब्ध असलेल्या लस समप्रमाणात यादी तयार करून प्रसिद्ध करून यादीतील व्यक्तींना फोन द्वारे कळविण्यात येणार ह्या व्यतिरिक्त कोणीही लसीकरण करिता येऊ नये. तसेच जास्त लसीचा पुरवठा व्हावा याकरिता जास्त लसीची मागणी करण्यात आली आहे.अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे आणि ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
