आंतरमहाविद्यालयीन बेसबॉल (मुले) स्पर्धेत सोमैया महाविद्यालयाचा एकतर्फी विजय…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
अहिल्यानगर जिल्हा विभागीय क्रीडा समिती व के. जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन बेसबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात के. जे. सोमैया महाविद्यालयाने संगमनेर महाविद्यालयाचा पराभव करत एकतर्फी विजय मिळवला, अशी माहिती सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी येथे दिली.
प्रारंभी अहिल्यानगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. विक्रम सातपुते व प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सोमैया महाविद्यालयाच्या संघाने 10-04 अशा 06 रनांच्या फरकाने संगमनेर महाविद्यालयाच्या संघाचा पराभव केला. विजयी संघाला सोमैया महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुनील कुटे यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत संजीवनी इंजिनिअरिंग महाविद्यालय, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग महाविद्यालय, मालपाणी विधी महाविद्यालय, प्रवरा इंजीनियरिंग महाविद्यालय व के. जे. सोमैया महाविद्यालय अशा सहा संघांनी सहभाग नोंदवीत स्पर्धेत रंगत आणली.
या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गणेश नरोडे, डॉ.अजित कदम, डॉ. प्रमोद विखे, प्रा. प्रशांत शेंणकर, प्रा. अर्चना नवले आदी मान्यवर उपस्थित होते, तर शमित माळी, प्रवीण मुंगसे, मुस्तकीम पिरजादे यांनी स्पर्धेसाठी पंच म्हणून मोलाची भूमिका बजावली. तसेच के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. मिलिंद कांबळे व श्री. किशोर गायकवाड यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *