सामाजिक जबाबदारी म्हणून प्लाझ्मादान करण्याची मानसिकता रुजविण्याची गरज:- विवेक भैय्या कोल्हे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
संपूर्ण देशभरात कोरोना ने चांगलेच कहर केले आहेत. आलेल्या दुसरी लाटेचा प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम होतांना दिसत आहेत कोरोना बाधित झालेल्या रुग्णांना वेळेवर बेड मिळेना, उपचारासाठी लागणारे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना आलेल्या संकटाला सामारे जावे लागत आहे. कोरोना बाधित रुग्णांना इंजेक्शन पेक्षा प्लाझ्मा थेरपी रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याने प्लाझ्माची दिवसेंदिवस मागणी वाढत आहेत तितकेच तुटवडा देखील प्रचंड वाढत असुन सामाजिक जबाबदारी म्हणून प्लाझ्मादान करण्याची मानसिकता रुजविण्याची गरज असल्याचे मत कोपरगाव तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.
कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना उपचार, औषधे, इंजेक्शन वेळेवर न मिळाल्याने अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. दुसरी लाटेत कोरोनाची परिस्थिती पहिल्यापेक्षा ही गंभीर राहणार हे माहिती असतांना देखील सरकार ने उपाय योजना केले पाहिजे होते.परंतु कुठल्याही उपाय योजना न केल्याने परिस्थिती हातातुन निघुन गेली व त्या परिस्थितीचे खापर नागरिकांवर फोडण्याचे काम सुरु केले. सुरुवातीलाच उपाय योजना केले गेले असते अनेकांचे प्राण देखील वाचले असते. गंभीर झालेली परिस्थिती हाताबाहेर गेली नसती.
कोरोनांमुळे अनेकांची आर्थिक गणिते बिघडल्याने उपचारासाठी पैसे उभे करायचे तरी कसे अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक रुग्ण घरच्या घरी उपचार घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. जे काही रुग्ण हाॕस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांना देखील उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहेत, यावर प्लाझ्मा हा एकमेव
पर्याय असल्याने रुग्णांचे नातेवाईक प्लाझ्मासाठी राञदिवस एक करत आहेत. प्लाझ्माची मागणी सोशलमिडीयावर देखील येत आहेत यावरुन असे लक्षात येते की, प्लाझ्मा चा प्रचंड तुटवडा आहे. रुग्ण कोरोना बाधित झाल्यापासुन तर तो रुग्ण घरी जाई पर्यंतची सविस्तर माहिती प्रशासनाकडे उपलब्ध आहेत तीच माहिती सेवाभावी संस्था , रक्तपेढी यांच्या कडे दिलीतर निश्चितच प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्यास चांगली मदत होईल त्याचबरोबर रुग्णांना दिलासा देखील मिळेल. कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी सुविधा उपलब्ध होत नसल्याने वैद्यकीय अधिकारी, नागरिक देखील हतबल झाले आहेत.
प्लाझ्मा हा रक्तातील एक पिवळसर द्रव घटक असून त्याचे रक्तातील प्रमाण सुमारे 55 टक्के इतके असते त्यातील जीवनावश्यक घटकद्रव्ये पेशी आणि विशेषता प्रथिने असतात करून आतून संपूर्णतः बरे झालेल्या व्यक्तीचा सुमारे 28 दिवसानंतर प्लाझ्मा काढून तो गंभीर स्थितीत असलेल्या व्यक्तीला देण्याची प्रक्रिया म्हणजे प्लाझ्मा थेरपी. ज्याचे वय 18 ते 60 ज्यांचे वजन 50 किलो पेक्षा जास्त आहे जी व्यक्ती कोरोना आजारातून पूर्ण बरी झालेली व्यक्तीला प्लाझ्मा कोरोना बाधित झालेल्या रुग्णाला सोपे जाते या निमित्ताने कोरोना बाधित होवुन गेलेले नागरिकांना आवाहन करतो की, आपल्या एका प्लाझ्मा दानाने एखादे चे एकप्राण वाचवु शकतो त्यामुळे त्या नागरिकांना प्लाझ्मा दान करण्यासाठी एक पाऊल पुढे यावे असे आवाहन देखील विवेक कोल्हे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *