तालुक्यातील सर्व नागरिकांनी लसीकरणासाठी प्रतिसाद द्यावा:- तहसीलदार विजय बोरुडे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील जनतेला विनम्र आवाहन…
कोरोना अजून ही संपलेला नाही..
बेफिकीर वागणे .. महागात पडेल.. जीवा पेक्षा काहीही प्रिय नाही..
स्वतः ची, आपल्या कुटुंबाची,
आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तींची…
आपल्या गल्लीतील…
वॉर्ड मधील…
आपल्या गावातील नागरिकांची ….
काळजी घेणे गरजेचे झालेले आहे..
कोरोणा वर मात करण्याकरिता फक्त लसीकरण हा उपाय आहे..
आपल्या तालुक्यात अजून ही 30% जनतेने लसीकरण करून घेतलेले नाही..
लस साठा आपल्या कडे उपलब्ध आहे…
आरोग्य कर्मचारी तसेच तलाठी ग्रामसेवक आशा अंगणवाडी सेविका ANM
पोलिस पाटील बूथ लेव्हल ऑफिसर व गावातील सर्व शासकीय कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक हे लसीकरण करण्या कामी प्रयत्न करत आहेत…
आपणा सर्वांना प्रशासन मार्फत आवाहन करण्यात येते की…
आपल्या तालुक्यातील सर्व नागरिकांनी लसीकरणास प्रतिसाद द्यावा व स्वतः तसेच आजूबाजूच्या सर्व व्यक्तींचे लसीकरण करून घ्यावे..
कोणत्याही अफवांना बळी न पडता … लसीकरण मोहीम यशस्वी करावी..
लसीकरण संदर्भात आपणास काहीही शंका असल्यास आरोग्य कर्मचारी.. तलाठी.. ग्रामसेवक.. तथा तालुका प्रशासन यांचेशी संपर्क करावा..
तालुका प्रशासन.. कोपरगाव..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *