पस्तीस लाख रुपये किंमतीचे मुद्देमालासह वेहिशोबी साठ किलो चांदी जप्त नाकाबंदी दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांची धडक कार्यवाही….

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्हयाचे मा पोलीस अधीक्षक श्री . मनोज पाटील साहेब , मा.अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर दिपाली काळे मॅडम , मा उपविभागिय पोलीस अधिकारी शिडी श्री.संजय सातब साहेब यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनानुसार जिल्हयातील मालमत्तेच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यांना आळा घालण्यासाठी पोलीसांची धडक कारवाई सुरू आहे.तसेच मा जिल्हाधीकारी साहेब अनगर यांचेकडील कोरोना प्रतीबंध आदेशक डीसी कार्या / ९ / २ / ४ ९ १२ / २०२१ आदेश अनगर दि १४/०४/२०२१ अन्वये यांची अंमलबजावणी करणे करीता साई कॉर्नर येथे नाकाबंदी दरम्यान पोनी देसले साहेब यांनी साठ किलो बेहिशोबी चांदी जप्त केली आहे . ता .१० / ०४ / २०२१ रोजी २१/०० वा.चे सुमारास पोनी देसले साहेब , सोबत पोका खारतोडे , पोका नवाळी , होमगार्ड अमोल घोरात होम विशाल कोळपे व चालक सफी साठे असे मा जिल्हाधीकारी सो अनगर यांचेकडील करोना प्रतीबंध आदेशाची अंमलबजावणी करणे करीता साई कॉर्नर येथे नाकाबंदी करीत असताना इसम नामे सौरभ अनिल पाटील वय २६ वर्ष धंदा व्यापार रा राजगुरुनगर हुपरी जि कोल्हापुर हा त्याचे मालकीचे मारुती सियाज कार क्र एम एच १८ ए जे २०२० हि घेउन येवला . कोपरगाव मार्गे शिडी कडे जात असताना त्याने वाहनाची काच उघडी ठेउन तोंडास मास्क लावलेला न्हवता यामुळे त्याचेवर दंडात्मक कार्यवाही करणे करीता त्याची कार थांबवली असता त्याने सांगीतेल की मी हार्डवेअर विक्रीकरणारा व्यापारी असुन माझे गाडीत काहीही नाही असे सांगीतल्याने कोपरगाव शहर पोस्टेचे पोनी वासुदेव देसले यांना सदर इसमाचा संशय आला असता त्यांनी सदर इसमास त्याचे गाडीची झडती देण्याबाबत सांगीतले असता गाडीतील पाठीमागील सिट पाहता त्यास चैन बसवलेली होती व काही भाग फुगीर दिसत होता यामुळे सदरची चैन उघडुन पाहता त्यात चोर कप्पा बनवलेला होता व त्यात एक पांढरे रंगाची गोणी लपवलेली होती तो बाहेर काढुन पाहता त्यात पांढरे रंगाच्या चांदीसदृश्य धातुचे ठोकळे दिसुन आले . त्यास पोनी देसले साहेब यांनी सदर चांदीसदृश्य धातु बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले व सदर चांदी बाबत काही एक समाधान कारक उत्तर दिले नाही , पोनी देसले साहेब यांनी त्यास त्याचे ताब्यातील साठ किलो चांदीचे काही खरेदी विक्रीचे कागदपत्रे सादर करणेबाबत सांगीतले असता त्याने माझ्याकडे मिळालेल्या साठ किलो चांदी खरेदीचा मझेकडे कोणताही कागद अथवा बिल नाही यामुळे पोनी देसले सो यांनी सफी पवार यांना दोन पंचासह घटनास्थळी बोलवले व दोन पंचासमक्ष सफा पवार यांनी वाहनाचा तसेच त्यातील चांदीचा पंचनामा केला असता त्या कारमध्ये एकुण साट किलो चांदी मिळून आली सदर घटनेची माहीती वरिष्ठांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनानुसार आरोपी नामे सौरभ अनिल पाटील वय २६ वर्ष धंदा व्यापार रा राजगुरुनगर हुपरी जि कोल्हापुर याचेवर कोपरगाव शहर पोस्टेस गुरन १२०/२०२१ महाराष्ट्र पोलिस कायदा १२४ सह भादवी १८८ ( २ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्यातील वापरलेली पाच लाख रुपये किमतीची मारुती सियाज कार क्र एम एच १८ ए जे ९ ०२० व तीस लाख रुपये किंमतीची साट किलो चांदी असा एकुण पस्तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सफी संजय पवार हे करीत आहेत . सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री.मनोज पाटील साहेब , अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर सौ . दिपाली काळे मॅडम , उपविभागिय पोलीस अधिकारी शिर्डी श्री . संजय सातव साहेब , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले साहेब यांचेसह सफो साठे पोका खारतोडे , पोका नवाळी , होम थोरात , होम कोळपे यांनी साई कॉर्नर येथे नाकाबंदी दरम्यान केली आहे . ह्या धडक कार्यवाही मुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *