
कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्रात गेल्या 9 महिन्यात 121 पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत.. एकट्या एप़िल महिन्यात 49 पत्रकार आपल्याला सोडून गेले आहेत.. आपल्या डोळ्यासमोर आपले मित्र जात असताना आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाहीत ही अगतिकता क्लेशदायक आहे.. ज्या व्यवस्थेवर आपली भिस्त आहे त्या व्यवस्थेने आपल्याला आणि एकूणच समाजाला वारयावर सोडलं आहे.. त्यामुळे राज्यभर हाहाकार उडालेला आहे.. उपचार व्यवस्थित होत नाहीत आणि लूट ही मोठी चालू आहे.. सरकार ती थांबवू शकलेले नाही.. पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर संबोधावे, सर्व वयोगटातील पत्रकारांना लस दिली जावी, उपचारासाठी राखीव बेडची व्यवस्था व्हावी, दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना अन्य काही राज्यांप्रमाणे आर्थिक मदत दिली जावी अशा मागण्या आपण वारंवार केल्या पण सरकारनं त्याची दखल घेतली नाही. कोरोना स्थितीमुळे सारेच घरात अडकून पडल्याने काहीच करता आले नाही.. तात्पर्य आम्ही सारे हतबल आणि अगतिक झालो.. मात्र गप्प बसूनही चालणारे नव्हते.. आपल्या संतप्त भावना सरकारच्या कानावर सातत्यानं गेल्याच पाहिजेत म्हणून आपण आत्मक्लेष आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.. खरं म्हणजे अगोदर मी एकटाच आत्मक्लेष करणार होतो मात्र माझ्या आंदोलनास राज्यभर पाठिंबा दिला जात आहे.. मी सर्वांचा आभारी आहे..
आंदोलन करताना आपण काळजी घ्यावी ही विनंती आहे.. सध्या लॉकडाऊन असल्याने घरात बसूनच हे आंदोलन करावे.. तेथेही लॉकडाऊनचे नियम पाळावेत .. सोशल डिस्टस्टिंग, सॅनिटायझर वगैरे पथ्ये पाळली जावीत.. आपण आत्मक्लेष आंदोलन करीत असल्याच्या जास्तीत जास्त पोस्ट सोशल मिडियावर टाकाव्यात.. या पोस्ट मेलवरून मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री विरोधी पक्ष नेते यांनाही पाठवाव्यात. ज्या तालुका, जिल्हा संघांना शक्य आहे त्यांनी एक किंवा दोन पदाधिकारयांनी तहसिल अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन द्यावे.. कोणत्याही परिस्थिती प्ंतयेकानं आपली काळजी घ्यावी..
मी बीड जिल्हयातील देवडी येथील माझ्या “माणिकबाग” या फार्म वर आंदोलन करीत आहे.. सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत माझे आंदोलन असेल..कृपया मला भेटण्यासाठी कोणी येऊ नये..
आत्मक्लेष आंदोलनास बेळगावपासून नागपूर, गडचिरोली पर्यत सर्वत्र पाठिंबा दिला जात आहे.. सर्वांचे मनापासून आभार..
एस.एम.देशमुख…
