परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिराला ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सालकर यांनी अर्धा किलो पेक्षा जास्त चांदी भेट स्वरूपात दिली…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
जगातील एकमेव मंदिर जेथे कोणत्याही शुभकार्यास मुहूर्त बघावा लागत नाही असे परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरात हिंदू धर्मात सर्वात पवित्र महिना मानला जाणारा श्रावण महिना या महिन्यामध्ये मंदिरामध्ये अनेक भक्तांची रेलचेल असते विविध उपक्रमातून मंदिरा मध्ये पवित्र श्रावण महिना साजरा केला जातो अशाच पवित्र महिन्याचे औचित्य साधून ऐतिहासिक कोपरगाव शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री राजेंद्र सालकर साहेब यांनी मंदिराला अर्धा किलो पेक्षा जास्त चांदी मंदिर प्रशासनाकडे सुपूर्त केली मंदिरामध्ये असलेल्या शिवपिंडीला जे चांदीचे आवरण करावयाचे आहे त्यासाठी सालकर कुटुंबाच्या वतीने या शुभ कार्यास हातभार लावला आहे त्याबद्दल मंदिर प्रशासन त्यांचे ऋणी आहे यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने ही चांदी स्वीकारताना मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदीर प्रमुख प्रसाद पऱ्हे, कमिटी सदस्य आदिनाथ जी ढाकणे, विशाल राऊत , मंदिराचे पुजारी राकेश जी भणगे व जोशी गुरुजी हे हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *