कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे बांधण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कर्मवीर शंकररावजी काळे यांची जन्मभूमी असलेल्या कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील श्री दत्त व श्री मारुती देवस्थान ट्रस्ट व श्री अमृतेश्वर देवस्थान ट्रस्ट चे कर्मवीर शंकररावजी काळे संस्थापक आहेत. त्यांच्या स्मरणार्थ या ट्रस्टच्या वतीने माहेगाव देशमुख येथे माहेगाव देशमुख-मळेगाव थडी रोडवर भव्य प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे.
यावेळी सरपंच सौ. सुमनताई रोकडे, उपसरपंच भास्करराव काळे, माहेगाव देशमुख सेवा सह. सोसायटीचे चेअरमन संजय काळे, श्री अमृतेश्वर देवस्थान व श्री दत्त व मारुती देवस्थानचे विश्वस्त, सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य व माहेगाव देशमुख ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ:- माहेगाव देशमुख येथे प्रवेशद्वार उद्घाटन प्रसंगी आ. आशुतोष काळे समवेत मान्यवर.
