दिवाणी न्यायालय इमारतीच्या कामाची २८.२१ कोटीची निविदा प्रसिद्ध:- आ. आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या बांधण्यात आलेल्या ब्रिटीशकालीन इमारतींची दुरावस्था झाल्यामुळे न्यायदानाच्या कामकाजात अडचणी येत होत्या. त्यामुळे न्यायालयाची नवीन इमारत व्हावी अशी बार असोसिएशनची अनेक वर्षापासूनची मागणी लवकरच पूर्ण होणार असून दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या २८.२१ कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
ब्रिटीश काळात बांधलेले कोपरगाव शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालयाची इमारत मुदतबाह्य झाली होती व या इमारतीचा काही भाग कोसळला देखील होता तरी देखील या ठिकाणी न्यायालयीन कामकाज सुरु होते मात्र कामकाजात अडचणी येत होत्या. आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या न्यायालय परिसराच्या पाहणी दरम्यान बार असोसिएशनच्या सदस्यांनी दिवाणी व फौजदारी न्यायालयाची इमारत मोडकळीस आल्यामुळे न्यायदानाच्या प्रक्रीयेत अडचणी येत असल्याचे सांगत न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली होती.
त्या मागणीनुसार आ. आशुतोष काळे यांनी दिवाणी व फौजदारी न्यायालयाची नवीन इमारत बांधण्यासाठी निधी मिळावा यासाठी दाखल केलेल्या प्रस्तावाची महाविकास आघाडी सरकारने दखल घेवून राज्याचे अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी इमारतीसाठी तात्काळ निधी मंजूर केला होता. त्या मंजुरीतून दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामाची २८.२१ कोटीची निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे लवकरच नवीन इमारतीच्या कामास प्रारंभ होवून सर्व सुविधांनी पिपूर्ण असलेली सुसज्ज वस्तू उभी राहणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून न्यायदानाच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी दूर होणार असल्यामुळे बार असोसिएशनच्या सदस्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *