

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील काकडी /मल्हारवाडी ग्रामपंचायत कार्यालय श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ,प्राथमिक शाळा, (काकडी, डांगेवाडी, मल्हारवाडी, गुंजाळवस्ती ) व न्यू इंग्लिश स्कूल काकडी येथे प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एअरपोर्टचे डायरेक्टर श्री सुशील कुमार श्रीवास्तव साहेब, CISF चे मुख्य अधिकारी श्री अमिष कुमार साहेब, एअरपोर्ट टर्मिनल मॅनेजर श्री मुरली साहेब, स्पाईस जेट कंपनीचे स्टेशन मॅनेजर सी. एच. लिंगम साहेब, इंडिगो एअरलाईन्स कंपनीचे स्टेशन मॅनेजर श्री आशिष अब्राहम साहेब, कार्गो विभागाचे श्री कृष्णा शिंदे साहेब, विद्युत विभागाचे अभियंता श्री अजय देसाई साहेब, सिव्हिल डिपार्टमेंटचे अभियंता श्री कौस्तुभ ससाने साहेब, मेजर कांडेकर साहेब, मेजर गुंजाळ साहेब, तलाठी श्री कोळगे साहेब, ग्रामसेवक श्री कारले साहेब, मुख्याध्यापक श्री गुडघे सर, मुख्याध्यापिका सौ. वाकचौरे मॅडम, त्याचबरोबर प्राथमिक शाळेचे शिक्षक वृंद, न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक वृंद, एअरपोर्ट चे विविध विभागातील अधिकारी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा सेविका, सफाई कर्मचारी, टॅक्सी चालक-मालक, ग्रामस्थ यांना ग्रामपंचायत व एअरपोर्ट टॅक्सी संघटनेच्या वतीने प्रजासत्ताकदिन साजरा करुन शुभेच्छा दिल्या तसेच श्री कानिफ गुंजाळअध्यक्ष – श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी वाहतूक सहकारी संस्था.यांनीही प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

















